डॉ.पंकज मनोहर पटले यांची यु.पी.एस.सी.परीक्षेत निवड

0
1691

चित्रा कापसे
तिरोडा–तालुक्यातील ठाणेगाव येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील शैक्षणिक पार्श्वभूमीचा वारसा लाभलेल्या, डॉ.पंकज पटले यांचा यु.पी.एस.सी.परीक्षेत निवड झाली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पंकजचे वडील नुकतेच जिल्हा परिषद शाळा धादरी येथून प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले, आई गृहीणी अशा सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने आय ए एस परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले , पंकजचे रहीवाशी शहरात साई काॅलोनी नेहरु वार्ड,चुरडी रोड तिरोडा येथे आहे तिरोडा शहराचे नाव संपूर्ण देशात लौकिक केले असून,डॉक्टर पंकजचा भाऊ सुद्धा एमबीबीएस डॉक्टर असून तो सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. डॉ पंकज, वडील एम एम पटले व आई सौ लता पटले यांनी मुलांना उत्तम रीतीने मार्गदर्शन केले असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.