दादालोरा खिडकी योजनेंतर्गत चिचगड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

0
46

 

दि.२४- गोंदिया जिल्हा पोलिसदल , ट्रायबल वेलफेअर कमिटी, रोटरी इंटरनेशनल आणि नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने चिचगड पोलिस स्टेशन हद्दीतील श्रीराम विद्यालय चिचगड येथे  काल बुधवारी (दि.२३) एकदिवसीय निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोदन करण्यात आले होते.

गोंदियाचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा तथा देवरीचे पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील यांचे मार्गदर्शनात चिचगड पोलिस स्टेशनचे ठाणेदार तुषार काळेल यांचे नेतृत्वात या आरोग्य शिबिराचे आय़ोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नेत्ररोग, बालरोग, स्त्री रोग, शल्यचिकत्सक, कान-नाक घसा, हदयरोग या रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्चरांच्या पथकामध्ये वैद्यकीय चमू चे प्रमुख डॉ.दीपक घुटे यांचा समावेश होता.

या शिबिराचा लाभ चिचगड पोलिस स्टेशन हद्दीतील देवलगाव, भागी-शिरपूर, कडीकसा, मेहताखेडा, झाशीनगर, सिंगणडोह व आजूबाजूच्या गावातील गावकरी, महिला, लहान मुले व प्रतिष्ठीत नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यात एकूण २५२ लाभार्थ्यांनी आपला सहभाग नोदवून तपासणीचा लाभ घेतला. उपचार घेतलेल्यापैकी ५५ रुग्णाना पुढील तपासणी व उपचार करिता शालीनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर, वानाडोंगरी नागपूर येथे रेफर करण्यात आले.

पोलिस स्टेशन चिचगडचे अधिकारी व अंमलदार यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर यशस्वी झाले. वरील कार्यक्रमात पोलिस स्टेशन चिचगड कडून भोजनाची सोय करण्यात आली होती. पोलिसांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतूक होत असून पोलिस दलाचे नागरिकांनी अभिनंदन केले.