गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायत राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित

0
586

·         हवामान कृती विशेष पुरस्कारात अव्वल

गोंदियादि.24 राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त  देशातील विविध ग्रामपंचायतींना व तसेच संस्थांना  केलेल्या  उत्कृष्ट  कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये राज्यातील गोंदिया  जिल्ह्याच्या डव्वा/स ग्रामपंचायतीला  हवामान कृती  विशेष पंचायत पुरस्कार(CASPA)  वर्ष  2023-24 साठी पंतप्रधान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय पंचायत राज दिन-2025 निमित्त मधुबनीबिहार येथे पंचायती राज मंत्रालयाकडून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोह्यात प्रथमच हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार (CASPA), आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार (ANPSA) आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार (PKNSSP) या श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.  हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील  डव्वा/स ग्रामपंचायती उत्कृष्ट कामगिरी केली असूनसर्वोत्तम स्थान मिळवले आहे. हा पुरस्कार ग्रामपंचायतच्या सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी पंतप्रधानांच्या हस्ते स्वीकारला.  पुरस्काराचे स्वरुप 1 कोटी रुपये रोख पारितोषिकमानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.

हवामान बदलावर मात करणारी डव्वा/स ग्रामपंचायत ठरली देशात आदर्श

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीने हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार (CASPA) मध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्याचाच नव्हे तर देशाचा गौरव वाढवला आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने प्रभावी पावले उचलत हवामान बदल विरुद्ध त्यांनी प्रभावीरित्या राबवलेल्या उपाययोजना राष्ट्रीय पातळीवर आदर्श ठरल्या आहेत.

डव्वा/स ग्रामपंचायतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे गावात पर्यावरणपूरक जीवनशैली रुजवली आहे. गावातील प्रत्येक घरात सौर ऊर्जेचा वापर वाढावा यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात आले असूनप्लास्टिक व फटाक्यांवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे गावाचा कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरित्या कमी झाला आहे.

निसर्गातील पंचतत्त्वांचे – पृथ्वीवायूजलअग्नी आणि आकाश – संवर्धन करण्यासाठी जैवविविधता जपणारे उपक्रम प्रभावीपणे राबविले गेले. ग्रामपंचायतीच्या या यशामागे सरपंच योगेश्वरी चौधरी आणि ग्रामपंचायत अधिकारी सिंधू सूर्यवंशी यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. गावकऱ्यांनी एकजुटीने या उपक्रमांमध्ये सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या सर्व उपक्रमांची दखल घेत 11 एप्रिल 2025 रोजी भारत सरकारच्या निरीक्षण पथकाने श्रीमती अनुराधा आणि श्रीमती नीलिमा गोएल यांनी डव्वा/स ग्रामपंचायतीची पाहणी केली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे मन:पूर्वक कौतुक करतअन्य गावांसाठी हे एक उत्तम उदाहरण असल्याचे ही मत व्यक्त केले.

इतर पुरस्कार विजेते

CASPA अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यातील बिरदहल्ली ग्रामपंचायतीने मिळवला असून त्यांना 75 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. तर तिसरा क्रमांक बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील मोतीपूर ग्रामपंचायतीला मिळाला असून त्यांना 50 लाख रुपयांनी सन्मानित करण्यात आले आहे.

यासोबतआत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार (ANPSA) अंतर्गत तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मल ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावून 1 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील हातबदरा ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचा पुरस्कार पटकावलातर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गोल्लापुडी ग्रामपंचायतीला तिसरा क्रमांक मिळाला असून त्यांना 50 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.

पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार (PKNSSP) अंतर्गतही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. या श्रेणीत प्रथम क्रमांक केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेशन (KILA), केरळ यांना देण्यात आला असून त्यांनी 1 कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले. दुसरा क्रमांक ओडिशातील राज्य ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेला मिळाला असून त्यांना 75 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला. तिसऱ्या क्रमांकावर आसाममधील राज्य पंचायत आणि ग्रामीण विकास संस्था असून त्यांना 50 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.