अर्जुनी-मोर. तालुक्यात 71 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहिर

0
65

= विविध प्रवर्गातील 36 महिलांसाठी सरपंच पद आरक्षित =
अर्जुनी-मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे )–
अर्जुनी-मोर. तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज ता.24 एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या मार्केट यार्ड मधे तहशिलदार अनिरुद्ध कांबळे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आली.
सन 2025 ते 2030 नुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज काढण्यात आली त्यानुसार राजोली अनुसूचित जाती, तिडका अनुसूचित जाती स्त्री, इसापूर अनुसूचित जाती स्त्री, वडेगाव बंध्या अनुसूचित जाती स्त्री, परसोडी रयत अनुसूचित जाती, कुंभिटोला अनुसूचित जाती स्त्री, रामपुरी अनुसूचित जाती स्त्री, दाभना अनुसूचित जाती, झासीनगर अनुसूचित जाती, देवलगाव /येरंडी अनुसूचित जाती स्त्री, ईळदा अनुसूचित जाती, कन्हाडगाव/ साय. अनुसूचित जाती स्त्री, बुधेवाडा अनुसूचित जाती, सिलेझरी अनुसूचित जमाती, सावरटोला अनुसूचित जमाती स्त्री, अरततोंडी / दाभना अनुसूचित जमाती स्त्री, निमगाव अनुसूचित जमाती, बोंडगाव देवी अनुसूचित जमाती, खांबी अनुसूचित जमाती, विहिरगाव बर्ड्या अनुसूचित जमाती स्त्री, पवनी धाबे अनुसूचित जमाती, नवनीतपूर अनुसूचित जमाती स्त्री, परसटोला अनुसूचित जमाती स्त्री, धाबेटेकडी/ आदर्श अनुसूचित जमाती, सिरेगाव अनुसूचित जमाती, प्रतापगड अनुसूचित जमाती स्त्री, महालगाव अनुसूचित जमाती, कवठा अनुसूचित जमाती स्त्री, गुढरी अनुसूचित जमाती स्त्री, भरनोली नामाप्र, कोहलगाव नामाप्र स्त्री, सोमलपुर नामाप्र, बोरटोला नामाप्र, नवेगाव बांध नामाप्र, चान्ना/ बाकटी नामाप्र स्त्री, महागाव नामाप्र स्त्री, खामखुरा नामाप्र स्त्री, कान्होली नामाप्र, बाराभाटी नामाप्र स्त्री, चापटी नामाप्र, मोरगाव नामाप्र, बोडदे/ करड नामाप्र स्त्री, गोठणगाव नामाप्र स्त्री, सुकळी सर्वसाधारण, तुकुमनारायण सर्वसाधारण स्त्री, येरंडी/ देवल. सर्वसाधारण स्त्री, बोंडगाव/ सुर. सर्वसाधारण, ताडगाव सर्वसाधारण, करांडली सर्वसाधारण, केशोरी सर्वसाधारण स्त्री, बोरी सर्वसाधारण, वडेगाव/ रेल्वे सर्वसाधारण, कोरंबीटोला सर्वसाधारण, कोरंबी सर्वसाधारण स्त्री, माहूरकुडा सर्वसाधारण स्त्री, मांडोखाल सर्वसाधारण, मुंगली सर्वसाधारण स्त्री, बोदरा सर्वसाधारण, बाकटी सर्वसाधारण, जानवा सर्वसाधारण, भिवखिडकी सर्वसाधारण स्त्री, शिरोली सर्वसाधारण, इटखेडा सर्वसाधारण, झरपडा सर्वसाधारण स्त्री, रामनगर सर्वसाधारण स्त्री, येगाव सर्वसाधारण स्त्री, पिंपळगाव/ खांबी सर्वसाधारण स्त्री, दिनकरनगर सर्वसाधारण, अरुणनगर सर्वसाधारण स्त्री, गौरनगर सर्वसाधारण स्त्री, येरंडी/दर्रे सर्वसाधारण स्त्री,असे एकुण 71 ग्रामपंचायत च्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
ही सोडत तहशिलदार अनिरुद्ध कांबळे यांचे अध्यक्षतेखाली काढण्यात आली.यावेळी निवडणुक विभागाचे नायब तहसीलदार पेंदाम,तथा प्रणय कापगते,विजय कोकोडे,गोपाल वलथरे,रुपचंद नाकाडे,व तहशिल कार्यालयातील कर्मचारी तथा प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
या आरक्षण सोडतीमुळे कही खुशी कही गम असे चित्र पहायला मिळाले.अनेक गावातील काही मातंबर मंडळी सरपंच पदाला घेऊन गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मात्र या आरक्षण सोडतीमुळे अनेकांचे स्वप्न भंग झाले तर अनेकांनी या आरक्षण सोडतीचे स्वागत केले.