वादळी वार्‍याने लग्न मंडप कोसळला, जीव मूठीत धरून वर्‍हाडींची धावपळ

0
87

औंढा नागनाथ  :- तालुक्यातील सुकापुर येथे २५ एप्रिल शुक्रवार रोजी आडे व राठोड परिवाराचा विवाह सोहळा होता. दरम्यान वर्‍हाडी आली व लग्न विधीचा (wedding ceremony) वेळ झाला सर्व वर्‍हाडी लग्न मंडपात बसली. नवरी नवरदेव मंडपात आले. यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वार्‍यामुळे क्षणातच मंडप कोसळला. यानंतर वर्‍हाडी जीव मुठीत धरून मंडपा बाहेर पळाली.

यादरम्यान सर्वत्र आरडा ओरड व पळापळ सुरू झाली. या घाई गडबडीत दोन वर्‍हाडी किरकोळ जखमी झाले. वादळी वार्‍यात मंडपाचे साहित्य पत्त्यासारखी हवेत उडून गेले. मंडपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात जीवित हानी टळली. परंतु घडलेल्या घटनेचा व्हिडिओ २६ एप्रिल शनिवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रचंड व्हायरल होत होता.