गोंदियाः जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या आतंकी हल्ल्यात निर्दोष, आणि निष्पाप हिंदूचे जीव घेण्यात आले, अतिरेक्यांनी धर्म विचारून जीव घेतले.या क्रूर घटनेचा निषेध नोंदवण्याकरीता आज शनिवारला गोंदिया शहर सायकांळी ६ वाजेनंतर स्वयस्पुर्तीने बंद करीत सर्व सामाजिक,धार्मिक सघटना व राजकीय पक्षाच्या वतीने शहरात रॅली काढत निषेध नोंदवण्यात आला.शहर बाजारपेठेतील मुख्य मार्गाने ही रॅली भ्रमणकरीत नेहरु चौकात पोचली.तिथे मृत पर्यटकांना सामुहिक श्रध्दाजंली वाहण्यात आली तसेच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.