बंद पडलेले वाचनालय व अभ्यासिका केंद्राचे उ‌द्घाटन;संजना बोहणे यांचा पुढाकार

0
45

तिरोडा- तालुक्यातील सालेबर्डी गावात अंजीलाल बोहणे यांनी सन २००० ते २००८ मध्ये जवळपास १० वाचनालय सुरू केले होते. काळानुरूप शासनाचे नवनवे अटी-शर्ती व नियमामुळे अनेक वाचनालय बंद पडले. यामध्ये सालेबर्डी येथील डॉ. सेवकलाल बोहणे नावाने सुरू केलेली वाचनालयाचाही समावेश होता. मात्र गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या त्रस्त होवू नये, या दृष्टीकोनातून त्यांची मुलगी संजना हिने पुढकार घेत बंद पडलेली वाचनालय सुरू केले. २४ एप्रिल रोजी डॉ. सेवकलाल बोहने वाचनालय तसेच राणी अवंतीबाई लोधी अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. वडिलांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी तसेच आपल्या गावात एकही सरकारी कर्मचारी नाही आता आपल्याला गावात शिक्षणाविषयी जागरूकता आणून स्पर्धा परीक्षेला पुढे जाऊन त्यात उत्तीर्ण होऊन गावात जास्त सरकारी कर्मचारी तसेच उच्च पदाधिकारी व्हायला पाहिजे, या जिद्दीने अंजीलाल बोहणे यांची मुलगी संजना बोहने हिने पुढाकार घेतला. दरम्यान बंद पडलेले वाचनालय सुरू करण्याला गती दिली. २४ एप्रिल रोजी डॉ. सेवकलाल बोहने वाचनालय तसेच राणी अवंतीबाई लोधी अभ्यासिका केंद्राचे शुभारंभ करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृउबासचे संचालक इंजी. राजीव ठकरेले हे होते. अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे संचालक राधेलाल पटले, अनंतलाल दमाहे, पं. स. सदस्य वनिताताई भांडारकर, वनिताताई ठाकरे, ज्ञानेश्वर दमाहे, महेंद्र लिल्हारे, खुशाल नागपुरे, नानेश्वर बिरणवार आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजना बोहणे यांनी केले. संचालन नंदकिशोर बोबडे तर आभार प्रदर्शन राकेश अटरे यांनी केला. कार्यक्रमासाठी अंजीलाल बोहणे, हितेश निनावे, विजय बोहने, सोमप्रकाश बाभरे, शुभम जवरे आदिंनी सहकार्य केले.