चित्रा कापसे
तिरोडा—तालुक्यातील बिरसी येथील बकर्या चालायला गेलेल्या मंगला जितेंद्र बोरकर (वय 50) यांचा काल सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वीज पडून मृत्यू झाला.
तालुक्यामध्ये प्रथमच अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये तिरोडा शहराला तसेच आजूबाजूच्या परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. बिरसी येथील मंगला बोरकर ह्या घराशेजारी बकर्या चालायला गेल्या असताना जोरदार वादळवार्यासह विजेचा कडकडाट झाला व मंगला बाईच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला, या प्रकरणाची तात्काळ दखल घेत तहसीलदार नारायण ठाकरे यांनी तलाठ्यानी तात्काळ पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या त्याचप्रमाणे सरपंच नंदकिशोर शरणागत यांनी ग्रामपंचायत कडून ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली,अधिक चौकशी तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमीत वानखडे करत आहेत.