अंजनगावच्या सहा निबंधक व लिपिकाला एसीबीने केली रंगेहाथ अटक…

0
58
अमरावती,दि.२८ः- जिल्ह्यातील अंजनगावच्या सहकार विभागातील सहायक निबंधक व वरिष्ट लिपीक यांना गृहतारण संस्थेच्या नोंदणी करिता ८००० रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ अटक करण्यात आली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
   यातील तक्रारदार यानी “नियोजित मधुराबाई गृहतारण सहकारी संस्था मर्या.भंडारज ता अंजनगाव सुर्जी जि.अमरावती” या नावाने संस्था नोंदणी करण्याकरीता सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अजनगांव सुर्जी येथे आवश्यक सर्व कागदपत्रांसह दिनांक ०९.१२.२०२४ रोजी प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याअनुशंगाने तक्रारदार हे दि. २२.०४.२०२५ रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय, सहकारी संस्था, अंजनगांव सुर्जी येथे जावून राजेश यादव, सहाय्यक निबंधक यांना भेटून संस्था नोंदणी बाबतचे काम झाले काय? याबाबत विचारणा केली असता, त्यांनी संस्था नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याकरीता तक्रारदाराकडे ७००० रूपयाची मागणी केली, त्यावेळी तक्रारदारांनी नाईलाजास्तव राजेश यादव यांना २००० रूपये दिले व उर्वरीत  ५०००रुपये नंतर आणुन देतो असे सांगीतले, परंतु तक्रारदारास उर्वरीत लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यानी त्यांचेविरूध्द ला.प्र.वि. अकोला येथे दिनांक २२.०४.२०२५ रोजी तक्रार नोंदविली.
    सदर तक्रारीवरुन दिनांक २५.०४.२०२५ रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाच पडताळणी कारवाई दरम्यान यातील आरोपी क्र. १) राजेश यादव, सहाय्यक निबंधक यानी स्वतः करीता ५,००० रूपये व आरोपी क्र. २ गणेश कुकडे, लिपीक यांनी तक्रारदाराकडे ३००० रूपये लाच रकमेची मागणी करून ती लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली.
   सोमवार दिनांक २८.०४.२०२५ रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय, सहकारी संस्था, अंजनगांव सुर्जी येथे रचण्यात आलेल्या यशस्वी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी क्र. १) राजेश राजदेव यादव यांनी तक्रारदाराकडुन रू. ५००० व आरोपी क्र. २) गणेश नारायण कुकडे यांनी तक्रारदाराकडुन ३००० रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. त्यावरून नमुद दोन्ही आरोपीतांना लाच रक्कमेसह ताब्यात घेण्यात आलेले असुन पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी जि.अमरावती येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
  सापळा अधिकारी मिलिंद बहाकर, पोलीस उपअधिक्षक, पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, राहुल इंगळे, अभय बावस्कर, संदिप ताले, किशोर पवार, निलेश शेगोकार, असलम शहा, चालक नफीस यांनी पार पाडली.