धान खरेदी संदर्भात खा.पटेलांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्र्यांनी घेतली मंत्रालयात बैठक

0
45

गोंदिया,दि.२८ : विदर्भातील धान खरेदी व्यवस्थापनासंदर्भात महत्त्वाची बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांतील धान खरेदी, भरडाई व साठवण प्रक्रियेसंदर्भात सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेत खासदार प्रफुल्ल पटेल सहभागी झाले होते.

अन्न व नागरी पुरवठा विभागातील विसंगत व कालबाह्य झालेले सर्व जुने आदेश तातडीने रद्द करावेत, आदिवासी शेतकऱ्यांना ‘टीडीसी’सह व्यापाऱ्यांना धान विक्रीचे दोन्ही पर्याय खुले करावेत आणि धान हाताळणी प्रक्रीयेत होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यभर जिल्हा जोडणी प्रक्रीया राबवावी, असे निर्देश मा. उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम, संबंधित जिल्ह्यातील आमदार, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.