कोहळी समाज विकास मंडळ च्या वतीने सत्कार सोहळयाचे आयोजन

0
27

अर्जुनी मोरगाव दि.२९: कोहळी समाज विकास मंडळ नागपूर व जिल्हा गोंदिया च्या वतीने कोहळी समाजातील विशेष प्राविण्य प्राप्त/ कार्य करून समाजाचा नावलौकिक केलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा दिनांक *30/04/2025 ला सायंकाळी 4-00 वाजता* साई श्रद्धा लान तावशी रोड मोरगावअर्जुनी येथे आयोजिले आहे

सदर सत्कार समारंभात पाल्कची सामुद्रधुनी पोहणारी पहिली दिव्यांग महिला जलतरणपटू *शाश्रुती विनायक नाकाडे,*
इस्रो येथे विशेष प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेले *परिणीता गजानन नाकाडे*, *आशय पुनेश्वर डोंगरवार*, DRDO च्या वैज्ञानिक वर्ग अ म्हणून निवड झालेले *प्रफुल्ल सुरेश लेंझे,* MPSC मार्फत अन्न सुरक्षा अधिकारी पदी निवड झालेले उमेश मार्तंड कापगते, ओमकार देवेंद्र लांजेवार, पूजा लोकनाथ बोरकर, महसूल सहायक म्हणून निवड झालेली पोर्णिमा भास्कर बोरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सत्कार कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कोहळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाळबुधे, उपाध्यक्ष अमोल पाटील मुंगमोडे, सचिव माणिक लोथे,गोंदिया जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, प्रकाश गहाणे , जिल्हासचिव होमराज पुस्तोडे , डॉ राजेश कापगते, ओमप्रकाश संग्रामे ,रमेश बोरकर, दिकेश ठिकरे , डॉ छाया कापगते, डॉ नयना बोरकर व कार्यकारिणीने केले आहे