सी.जे.पटेल महाविद्यालय भरती पुर्व पोलिस सैनिक मैदानी मार्गदर्शन शिबिर

0
16

चित्रा कापसे
तिरोडा- स्थानिक सी.जे. पटेल महाविद्यालय, मनोरभाई पटेल अकॅडमी व वीर शिवाजी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये ग्रीष्मकालीन भरती पूर्व पोलीस, अग्नीवीर, आर्मी, मार्गदर्शन शिबिराचे आयोजन 21 एप्रिल ते 29 एप्रिल 2025 या दरम्यान आयोजन करण्यात आले . या मार्गदर्शन शिबिरामध्ये 54 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन सहभाग नोंदविला. सदरील कार्यक्रम हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजयभरत सी.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. दिनांक 29/04/2025 रोजी बुधवार शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ.अजयभरत सी.शर्मा यांनी सांगितले की शारिरीक विकासाबरोबर मानसिक विकास होणे गरजेचं आहे तसेच कोणतीही गोष्ट मनापासून केली तरच यश मिळते हे सांगितले.

हे शिबीर यशस्वीरित्या घेण्यामध्ये कार्यक्रमाचे संयोजक डॉ. भूषण फुडें , डॉ. राहुल कुर्झेकर , आयक्युएसी सहसमनव्यक डॉ. रमेश तईकर, समन्वयक डॉ वलय तागडे तसेच डॉ. किसन गावित आणि माजी विद्यार्थी सौरभ मुखर्जी, अमोल चचाने , रिकेश सोनेवाने यांनी शिबिर संपन्नसाठी विशेष प्रयत्न केले.