देवरी,दि.28 : जिल्हाधिकाºयांनी आदिवासी विकास महामंडळाच्या देवरी येथील उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत देवरी व सालेकसा अशा दोन तालुक्यांत एकूण २५ आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे.
या अंतर्गत बुधवारी (दि.२५) देवरी तालुक्यात चिचगड, डवकी, गणुटोला, धमदीटोला, चिचेवाडा व अंभोरा असे सहा व सालेकसा तालुक्यात सालेकसा येथे एक असे सात खरेदी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. या सर्व धान खरेदी केंद्रांवर शासनातर्फे धानाचे दर ‘ए’ ग्रेड कॉमन १५९० रुपये आणि ‘सी ग्रेड’ कॉमनकरिता १५५० रुपये दर निर्धारित करण्यात आला आहे.
चिचगड व डवकी येथील धान खरेदी केंद्रांचा शुभारंभ आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग यांच्या हस्ते आणि देवरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक टी.एन. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी चिचगड येथे संस्थेचे सचिव एम.एल. खंडारे, संचालक प्रभाकर कोल्हारे, भूवन नरवरे तर डवकी येथे संस्थेचे अध्यक्ष मेहतरलाल कोराम, उपाध्यक्ष भाष्कर धरमशहारे, सचिव प्रकाश येल्ले यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.