गोंदिया/खातीया,दि.30: बिरसी विमानतळावर नुकताच एक दोन दिवसीय अभिप्रेरणा कार्यक्रम जीएसजी सुरक्षा एजेंसीद्वारे घेण्यात आले. या वेळी बिरसी विमानतळाचे डायरेक्टर सचिन बी. खंगर, जी.एस.जी. सुरक्षेचे गुरमीत qसग गील, गगण गील व इतर सुरक्षा कर्मचारी त्यांचे परिवार सह बिरसी विमानतळाचे कर्मचारी वर्ग प्रामुख्याने या कार्यक़्रमामध्ये उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाअंतर्गत जीएसजी सुरक्षाचे गुरमीत qसग गील १९९९ मध्ये झालेल्या कारगील युद्धामध्ये आर्मीचे मेजर असून ८० दिवस युद्ध केले तसेच ते अंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्फचे कोच असून त्यांनी आपल्या भाषणाद्वारे उपस्थितांना आपल्या जीवनाचे अनुभव सांगितले. व त्यांना जीवनात येणाèया अनेक समस्याच्यावेळी निराश न होता त्यावर मात करुन समोर वाढण्याची प्रेरणा दिली. यावेळी त्यांनी जीवनात व्यक्तीने सदैव खुश रहावे असे सांगितले. तर बिरसी विमानतळाव जीएसजीचे सुरक्षाकर्मी लोकचंद मुंडेले यांचा चांगले कार्य केल्याबद्दल बिरसी विमानतळाचे निदेशक सचिन खंगार, गुरमीतqसग गील, गगनqसग गील, सुरक्षा अधिकारी आनंद मेश्राम यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.