साकोली ,दि.31 : बचत गटाच्या माध्यमातून बचत गटातील महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढत असून, गावाच्या विकासाकरीता सहकार्य करीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने जिल्ह्यातील ३३८ बचत गटांना तीन कोटी रूपयांचे कर्ज वाटप करणारी व सर्व बचत गटांना कर्ज मंजुरीच्या कर्ज समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करणारी महाराष्ट्रातील पहिली बँक म्हणून भंडारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. त्यामुळे खासदार पटेल यांनी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांची कौतुकाने पाठ थोपटली.
साकोली तालुक्यातील सानगडी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने शेतकरी व महिला बचतगट मेळावा तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळा पार पडला. महिला बचतगट मेळावाप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून खासदार मधुकर कुकडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी आमदार सेवक वाघाये, सदाशिव वलथरे, मधुकर लिचडे, नितीन पाटील, उषा करपते, अशोक लिचडे, अविनाश ब्राम्हणकर, रविंद्र खंडाईत, मांडवटकर, वंसता खंडाईत, दीपक चिमणकर, बालु ईटानकर, शिवाजी खंडाईत, रामचंद्र कोहळे, शालिकराम हरडेकर, मनिषा कुरसुंगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व सरव्यवस्थापक संजय बरडे आदी उपस्थित होते. खासदार पटेल म्हणाले, भेल कारखाना तयार होऊन कार्यपूर्तीस आला असता, परंतु, भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे आजतागायत भेल कंपनीचे काम पुढे सरकले नाही. त्यामुळे परिसरातील बेरोजगारांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचे काम या सराकारने केले आहे. त्यांच्या साडेचार वर्षाच्या काळात जिल्ह्यात १० ते २० प्रकल्प आणू शकले असते. परंतु तसेही केले नाही. बेरोजगारांना मोठे आवश्वासने देत, दरवर्षी सत्ताधाऱ्यांनी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केली. उलट दीड कोटी बेरोजगार त्यांच्या या अनियोजित निर्णयामुळे बेरोजगार झाल्याने, बेरोगारांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. शेतकºयांना दुप्पट भाव देऊ असे आश्वासन सरकारने दिले होते, तेही फसवे ठरले. आमचे सरकार आल्यास शेतकºयांना क्विंटल मागे अडीच हजार रुपये देणार आहे.
आमचे शासन असताना,गोसेखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले. तसेच ९० टक्के निधी ओढून आणला. परंतु, मोदी सरकारने या गोसेखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाच्या यादीतून वगळून टाकले. तसेच निधीही बंद केल्याने सदर प्रकल्प पुर्ण झाला नाही. संचालन बंडू खंडाईत, बाळकृष्ण हटनागर यांनी केले. आभार रविशंकर लोथे यांनी मानले.