भंडारा/वाशिम, दि. २3 : भंडारा – गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी 32 उमेदवारांनी 79 अर्जाची उचल केली. आज पर्यंत एकूण 96 उमेदवारांनी 215 अर्जाची उचल केली. आज चार उमेदवारांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात नान्हे कारु नागोजी वंचित बहुजन आघाडी, डॉ. प्रकाश मालगावे अपक्ष, प्रकाश मालगावे भारतीय जनता पार्टी, देविदास लांजेवार विदर्भ राज्य आंदोलन समिती, तारिका देविदास नेपाले पिपल्स पार्टी ऑफइंडिया डेमोक्रेटिक यांचा समावेश आहे. यापूर्वी पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे भिमराव दुर्योधन बोरकर व सुहास अनिल फुंडे, अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून २२ मार्च २०१९ रोजी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे या मतदारसंघात दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या आता १३ झाली आहे.२२ मार्च रोजी दाखल अर्जांमध्ये संदीप अनंतराव देवकते (अपक्ष), रशीद खान हमीदखान (अपक्ष), संतोष बाबुसिंग जाधव (अपक्ष), अनिल जयराम राठोड (अपक्ष), अनिल जयराम राठोड (अपक्ष), शेख जावेद शेख मुश्ताक (अपक्ष), शहेजाद समिऊल्ला खान (अपक्ष) आणि पुरुषोत्तम डोमाजी भजगवरे या ८ अर्जांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज उचल करणाऱ्यांमध्ये खालील उमेदवारांचा समावेश आहे. इश्वर आसाराम कळंबे अपक्ष-3, डॉ.परिणय रमेश फुके भाजपा-4, ॲड. सिताराम हलमारे भाजपा-4, सुनिल मेंढे भाजपा-4, प्रितमसिंग नैताने भारतीय शक्ती चेतना पार्टी-1, नाना पंचबुध्दे एनसीपी-4, राजेंद्र गुलाबसिंग पंडेल भारतीय शक्ती चेतना पार्टी-1, विजय महादेवराव शिवणकर एनसीपी-4, सत्तार खान अब्बास खान अपक्ष-1, अनिल बाबुराव मेंढे अपक्ष/भाजपा-4, अविनाश दशरथ रंगारी आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया-3, अनिल बावणकर एनसीपी-4, रामलाल गोस्वामी बीएसपी-4, देविदास बोरकर भारिप बहुजन महासंघ-2, बाबु गंगाराम डोंगरे भारीप बहुजन महासंघ-2, सुरेंद्र खोब्रागडे भारीप-2, यशवंत तागडे भारीप-2, रणजित चौहान अपक्ष-2, शंकर वैद्य अपक्ष-2, रमेशकुमार कुथे भाजपा-3, आदित्य मोटघरे भाजपा-4, धनंजय राजाभोज अपक्ष-2, खुशाल बोपचे भाजप-4, इसुलाल कटरे अपक्ष-1, गयानीराम आमकर अपक्ष-1, निलेश फुलपूरी राष्ट्रवादी-2, बाबुराव मेश्राम अपक्ष-2, अनिल मेश्राम अपक्ष-1, युवराज अंबोले अपक्ष-1, चंद्रकुमार गणविर अपक्ष-1, विलास राऊत अपक्ष-2 व सुभाष भिवगडे बीएसपी-2 असे एकूण 32 उमेदवारांनी 79 अर्जाची उचल केली.