गडचिरोली,दि.23: 12 – गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदार संघातील निवडणूकीसाठी 5 जणांनी 7 अर्ज नेले तर 4 जणांनी 7 अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.नामदेव दल्लुजी उसेंडी- इंडियन नॅशनल काँग्रेस ( 3 अर्ज ) , देवराव मोनबा नन्नावरे- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (1 अर्ज), रमेशकुमार बाबुरावजी गजबे – वंचित बहुजन आघाडी ( 1 अर्ज), अशोक महादेवराव नेते- भारतीय जनता पार्टी (2 अर्ज ) यांनी आज अर्ज दाखल केले आहेत.
12- गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक अधिसूचना जारी झाली असून आदर्श आचारसंहिता यापुर्वीच लागू झाली आहे.नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 25 मार्च 2019 आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी 26 मार्च 2019, उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक 28 मार्च 2019 आहे. जिल्हयात मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत असून यामध्ये ई-व्ही एम तसेच व्हिव्हीपॅट संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यात 1950 हा टोलफ्री क्रमांक सुरु करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने सी-व्हिजील हे ॲपही निवडणुकीसंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले आहे.