गोंदिया,दि.07: येत्या विधानसभा निवडणूकीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेत राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवून सर्वसामान्यपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी बलकवडे यांनी सर्व राजकिय पक्षांना केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 7 सप्टेंबर रोजी सर्व मान्यता प्राप्त राजकिय पक्षांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे संपन्न झाली.
विधानसभा निवडणूकीत मदारांमध्ये जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याची विशेष मोहिम गाव पातळीवर सूरु आहे. ईव्हीएम तथा व्हीव्हीपॅट विषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांची मोलाची भूमिका असल्याचे मत जिंल्हाधिकारी यांनी सदर सभेत व्यक्त केले.उपस्थितांना जनजागृती मोहिम विषयी माहिती देऊन ईव्हीएम, व्हीव्हीपट संबंधी काही गैरसमज असल्यास त्याचे समाधान करण्यासाठी प्रत्यक्ष या मोहिमेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करण्याकरीता चर्चा करण्यात आली. ईव्हीएमवर मतदान केल्यास मतदान बरोबर झाले किंवा नाही तसेच ज्यांना मतदान केले त्यांनाच मतदान झाले की नाही, या बाबतची खात्री मतदार कडून करणे गरजेचे असून विविधि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सभेत उपस्थित केलेल्या विषयांवर जिल्हाधिकारी यांनी योग्य मार्गदर्शन करुन शंकांचे समाधान केले. या वेळेस प्रामुख्याने निवडणूक उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, सहा. अधिक्षक निवडणूक हरीशचंद्र मडावी, अ.का. नोखलाल कटरे, कनिष्ठ प्रोग्रामर प्रविण गडे, प्रणय तांबे कनिष्ठ अभियंता तसेच सर्व मान्यताप्राप्त राजकियपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.