जनगणनेसाठी सर्वपक्षीय ओबीसींची सहविचार सभा रविवारला 

0
36

गोंदिया,दि. ७ः- : केंद्र शासनाच्या वतीेने  सन २०२१ मध्ये  दर १० वर्षानी होणारी जनगणना करण्यात येणार आहे. त्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातीनिहाय स्वतंत्र जनगणना करण्यात यावी या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील सर्वपक्षीय ओबीसी आजी माजी लोकप्रतिनिधी,जिल्हा परिषद,नगरपरिषद,पंचायत समिती सदस्य,ओबीसी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते, अधिकारी,कर्मचारी, विद्यार्य़ांची सहविचार सभा ८ सप्टेंबर रोजी मयूर लॉन कटंगी येथे दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
जनगणनेच्या अनुषंगाने सर्वेची प्रक्रिया सुरू झाली आहे. १९३१ नंतर स्वतंत्र भारत वर्षात ओबीसी समाजाची स्वतंत्र जात निहाय जनगणना झाली नाही. जनगणनेच्या संदर्भात ओबीसी समाजासह नेत्यामध्ये तसेच कर्मचार्‍यांमध्ये गैरसमझ आहे. या दृष्टीने ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ आणि महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व सामाजिक राजकीय व कर्मचारी संघटनेच्या नेत्यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी या सभेला ओबीसी समाजातील सर्व समुदायानी उपस्थित रहावे, असे आवाहन  विविध ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघाच्यावतीने करण्यात आले आहे.