Ø जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक
Ø आय-पास संगणकीय प्रणाली कार्यान्वित होणार
भंडारा,दि. 29 :- जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 साठीचे वाढीव निधी मागणीचे प्रस्ताव सर्व यंत्रणांनी 15 जानेवारी पर्यंत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिल्या. निधी प्राप्त करुन घेवून वेळेत खर्च करण्याची जबाबदारी यंत्रणांची राहणार आहे. तसेच प्रस्तावात निवड केलेल्या कामाची बाब प्रधान्याने दर्शवावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपवन संरक्षक विवेक होशिंग व जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण आशा कवाडे उपस्थित होते.
जिल्हा नियोजनच्या सर्व योजनांचा डिसेंबर पर्यंत आढावा घेऊन ज्या योजनांवर खर्च होणार नाही तो इतर योजनांवर वळता करण्यात यावा, सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. सन 2020-21 चे प्रस्ताव यंत्रणांनी जानेवारी 2021 मध्ये सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.यावेळी जिल्हा नियोजन समितीकरीता तयार केलेल्या i-PAS संगणकीय प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. ही प्रणाली पादर्शक व पेपरलेस प्रशासन चालविण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. या बाबत 18 व 19 डिसेंबर 2019 रोजी प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी सांगितले.
या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 अंतर्गत सर्वसाधारण योजना-अनुसूचित जाती उपयोजना-आदिवासी उपयोजना (ओटीएसपी ) च्या खर्चास आढावा घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत सर्वसाधारण योजना-अनुसूचित जाती उपयोजना-आदिवासी उपयोजना (ओटीएसपी ) चे सविस्तर प्रस्ताव सादर करणे. सांसद आदर्श ग्राम योजनेतील निवड केलेल्या लाखांदूर तालुक्यातील जैतपूर या गावाचा विकास आराखडा, तसेच जिल्हा नियोजन समितीकरीता तयार केलेल्या i-PAS संगणकीय प्रणालीचे प्रशिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेण्याकरीता विभागांनी प्रस्ताव, आराखडा मान्यतेस्तव सादर करणे. वन, कौशल्यविकास, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा, आरोगय, महिला व बाल कल्याण, नगर विकास, लघुपाटबंधारे, विद्युत, उद्योग, रेशीम , पर्यटन, पाणी पुरवठा, आदी विभागाच्या निधी खर्चाबाबत आढावा घेण्यात आला.या बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.