गोंदिया,दि.18:- स्वातंत्र्य आणि विचार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून विचारप्रणालीच्या जोरावर समता, बंधुता टिकविण्यासाठी संविधानावर होणारे विचार मंथन फक्त कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता ते आचरणात आणण्यासाठी 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी संविधान जागर कार्यक्रम अंतर्गत संविधान मैत्री संघाच्या वतीने दि. 21 डिसेंबरला तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा तर 22 डिसेंबरला गोंदिया शहरात माजी सनदी अधिकारी तथा संस्थापक संविधान फाऊंडेशन संस्थापक,नागपूर यांच्या मार्गदर्शना खाली ‘संविधान जागर कार्यशाळा’ व समाज जागृती कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे.
21 डिसेंबरला श्री सत्य साई लॉन मुंडीकोटा येथे आयोजित कार्यक्रमाला समाज कल्याण अधिकारी मंगेश वानखेडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल तरोने, अनिल भुसारी, नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन चे डॉ. नामदेव किरसान, संविधान फाऊंडेशन नागपुर चे प्रा.महेंद्र मेश्राम, टीम आता लढुया एकिनेच नागपुर चे अतुल खोब्रागडे, संविधान मैत्री संघाचे पुरुषोत्तम मोदी, महेंद्र कठाणे प्रामुख्याने उपस्थीत राहणार आहेत.
22 डिसेंबरला केमिस्ट भवन सिविल लाईन गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमाला ओबिसी व्हीजे एनटी एसबीसी वर्गातील युवकाना नोक-या का मिळत नाही, समस्या व समाधान या विषयावर मार्गदर्शनासाठी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटचे बळीराज धोटे, मुस्लिम वर्गातील समस्यांवर मार्गदर्शनासाठी बामसेफचे प्रचारक शब्बीर पठाण, तर आदिवासी समस्यांवर मार्गदर्शना साठी नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन चे डॉ. नामदेव किरसान, संविधान फाऊंडेशन नागपुर चे प्रा.महेंद्र मेश्राम, टीम आता लढुया एकिनेच नागपुर चे अतुल खोब्रागडे, संविधान मैत्री महेंद्र कठाणे, डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. प्रशांत मेश्राम, डॉ.राजेन्द्र वैद्य, एड. एच.डी.सुर्यवंशी, एड. शैलेंद्र गडपायले, एड.प्रज्ञा डोंगरे, वनकर अकैडमी चे सुशील वनकर, स्टडी पॉईंट चे नरेंद्र मेश्राम प्रामुख्याने उपस्थीत राहणार आहेत.
संविधानाचा तत्वांनुसार भारताचे अपेक्षित विकास होने गरजेचे असतांना ते झाले आहे का ? हा विचार करण्यासाठी, संविधानातील लिखित प्रत्येक शब्दामागील अर्थ जाणून घेणे एक भारतीय नागरिक म्हणून आपले प्रथम व आद्य कर्तव्य आहे. देशाची आर्थिक प्रगती करने ही बंधीलकी हे स्विकारने स्वाभाविक असले तरी न्याय-समता-बंधुता, आचार-विचारतेच्या आधारे सर्वांगिण विकासाची व्याख्या आपण जाणने अगत्याचे असले पाहिजे. त्यासाठी संविधानाचा जागर करणे महत्वाचे आहे. ते संविधानाचा जागर..कार्यक्रमातून होईलच, तसेच प्रत्येकाच्या वर्तनातून पण संविधानाचा जागर होणे काळाची हाक बनत चालली आहे. याचे परिमार्जन समस्त देशवासियांना बांधील आहे. त्यासाठी एक प्रयत्नांची सुरवात करण्यासाठी या संविधान जागर कार्यशाळेत अधिक संख्येने उपस्थितीचे आवाहन संविधान मैत्री संघ, राजर्शी शाहू महाराज अभ्यासिका केंद्र, मराठा सेवा संघ, ओबिसी संघर्ष कृती समिती, युवा बहुजन मंच या संघटनानी केले आहे.