गोंदिया,दि.29ः-श्रीमती उमाबाई बहुउद्देशिय शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालिजत प्रोग्रेसिव्ह स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २0१९-२0 मध्ये घेण्यात आलेल्या निरनिराळय़ा स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्याचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात शारदा मातेच्या छायाचित्राला माल्यार्पण व द्विप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमित बुध्दे प्राचार्य डी.बी.एम. शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यशराम ढबाल क्रिडा शिक्षक लाखननी, अशोक लिल्हारे डॉग ट्रेनर रेल्वे सुरक्षा बल, विलास ठवकर संस्था संचालक सॉंई कम्प्युटर, गंगाधर सुलाखे सदस्य सेवा सहककारी बॅंक, लतिश बिसेन सरपंच चुलोद, कमलाककर गोटेकर रिर्जव्ह पोलिस इंन्सपेक्टर गोंदिया, नैलेश शेंन्डे कमांडो ट्रेनर राईफल शुटिग, अश्विनी केंन्द्र अध्यक्ष जे.सी.आय, डॉ. पंकज कटकवार संस्थाध्यक्ष, अलका कटकवार संस्था उपाध्यक्ष, डॉ. नीरज कटकवार संस्थासचिव, पदमा कटकवार संस्था सहसचिव यांचा स्वागत प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, प्राचार्या वाय आशा राव, मिनाक्षी महापात्रा, विककास पटले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. या प्रसंगी विविध क्रिडा स्पध्रेत प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान मिळविणार्या विद्यार्थ्यांचे पुरस्कार देऊन अभिनंद करण्यातत आले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रोत्साहन पुरस्कार करण्यात आले. डॉ. पंकज कटककवार यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येत क्रिडा स्पध्रेत सहभागी होण्याचे आव्हन केले.तससेच सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.