अर्जुनी मोर,दि.29ः- पदाधिकाèयांनी सभागृहात सुचविलेली कामे, अधिकारी व कर्मचाèयांकडून योग्य रीतीने हाताळली जात नाहीत. बालविकास प्रकल्प, मग्रारोहयो, कृषी, समाज कल्याण आदी विभागांचे कर्मचारी मनमर्जीने कामे करणे अशा चुका सुधारण्यासाठी वेळोवेळी निर्देश करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाèयांच्या या कार्यप्रणालीला कंटाळून २७ डिसेंबर रोजी पंस सभागृहात घेण्यात आलेल्या मासिक सभेच्या बैठकीतून सत्ताधाèयासह विरोधकांनी सभात्याग केला. तसेच येत्या ३ जानेवारीला आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र जिप मुख्य कार्यकारी अधिकाèयांना सादर केले आहे.स्थानिक पंसच्या मासिक बैठकीत घेण्यात येणाèया ठरावांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण होत आहेत. याअंतर्गत प्रकल्प अधिकाèयांनी खोटे गुण प्रमाणपत्र व प्रगतीपत्र तयार करून भरतीमध्ये चुकीचे गुणदान केले. १८ डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध करून तत्काळ २१ डिसेंबरला आदेश दिले. ३० जागांची भरती व प्रक्रिया पूर्ण होऊन २९ उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले, असे महत्त्वाचे विषय या सभेच्या अजेंड्यावर असताना प्रकल्प अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे खèया लोकांवर अन्याय झाला आहे. तसेच माहूरकुडा व सिरोली येथील ग्रामसेविकेने पंस सदस्यांकडूनच चुकीच्या व मनमर्जीने अधिकची करपट्टी वसूल केली, नागरिकांना वेळेत प्रमाणपत्र न देता टोलवाटोलवी करणे, झाशीनगर येथील ग्रामसेवकांची कुंभीटोला व बोदरा येथे ५ महिने होऊन सुद्धा स्थानांतरण होत नाही, अशाच प्रकारची दिरंगाईमग्रारोहयो विभागात कर्मचाèयांकडून कामात हेळसांडपणा करून नागरिकांना ताटकळत ठेवले जाते.पंसच्या इमारतीचा प्रश्न अजून सुटलेला नाही, असे अनेक प्रश्न व समस्या कायम असताना कर्मचारी व अधिकाèयांच्या लेटलतिफपणामुळे कंटाळून येत्या ३ जानेवारी रोजी आंदोलन करणार असल्याचे पत्र मुख्यकार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षकांना दिल्याचे पंस पदाधिकाèयांनी सांगितलेआहे.
घ