वडेकसा येथे दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

0
26

ककोडी(देवरी),दि.29ः तालुक्यातील वडेकसा (ककोडी) येथे मंडई निमित्ताने भव्य क्लोज कबड्डी स्पर्धेचे आयोजन आदर्श क्रिडा मंडळ वडेकसाच्यावतीने 3 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.या स्पर्धेत अंतिम सामन्यात प्रवेश करणार्या दोन्ही विजेता व उपविजेता संघातील खेळांडुचा प्रत्येकी एक लाख रुपयाचा अपघाती विमा आयोजकांनी काढला आहे. या विम्याचा कालावधी सुध्दा एक वर्षाचा ठेवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले असून मंडळाकडून चार पुरस्कार ठेवण्यात आले आहेत.त्यामध्ये प्रथम पुरस्कार 20,001 रुपये,व्दितीय पुरस्कार 10,001 रुपये,तृतीय पुरस्कार 5001 रुपये तर चतुर्थ पुरस्कार 2501 रुपये ठेवण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 501/ रुपये आकारण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उदघाटन देवरी आमगाव मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरोटे,सहउदघाटक आदिवासी सा,संस्था ककोडीचे सचिव कमल सलामे,युवा तालुका काँग्रेस अध्यक्ष संदिप भाटिया,उपसभापती गणेश सोनबोईर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तर स्पर्धेचे बक्षिस वितरण 5 जानेवारीला करण्यात येणार आहे.