देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेला मिळाले कार्यारंभ आदेश

0
51

गोंदिया,दि.29 : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ३२कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या देवरी-नवेगाव उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश शासनाने नुकतेच दिल्याने या भागातील हरितक्रांतीचा मार्ग मोकळा झाला आहे. योजनेमुळे परिसरातील ८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी या योजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.या योजनेला राज्याचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंजुरी दिली होती.मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे योजनेचे काम सुरू झाले नव्हते.आचारसंहिता संपल्यानंतर शासनाने या योजनेचे काम सुरु करण्याचे कार्यारंभ आदेश दिले आहे. त्यामुळे या योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून २०२१ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे निर्देश माजी आ.गोपालदास अग्रवाल यांनी सिंचन विभागाला दिले आहेत. या योजनेतंर्गत बाघवनदीवर तेढवा शिवनी उपसा सिंचन योजनेच्या पंपहाऊस जवळ पंप हाऊस तयार करण्यात येणार आहे.तसेच यासाठी १०कि.मी.पर्यंत अंडरग्राऊंड पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. या योजनेमुळे २० गावातील ८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे.