जांभूळदंड येथे बिबट आढळला मृतावस्थेत

0
29

गोंदिया,दि.14 : देवरी वनपरिक्षेत्रांतर्गत जांभूळदंड येथील कालव्याजवळ बिबट मृत अवस्थेत आढळल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. बिबटचा मृत्यू कशामुळे याची निश्चित माहिती मिळू शकली नाही. परंतु, श्वास गुदमरल्यामुळे त्या बिबटचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. जांभुडदंड येथील शेतकरी मुकेश सोरी  आपल्या शेतात जात असताना त्याला कालव्याजवळ एक बिबट मृत अवस्थेत आढळला. त्याने या घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच घटनास्थळावर वनअधिकारी महेश बोकडे दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता वैद्यकीय दवाखाण्यात पाठविण्यात आले. आरोग्य अधिकारी पी.एम. वराडपांडे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन करून बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबद काही अवशेष प्रयोग शाळेत पाठविले आहे. या बिबट्याचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वराडपांडे यांनी, हा बिबट नर असून त्याचे वय 5 वर्ष असल्याची माहिती दिली.