राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा
आमगाव,दि.14 : कार्यकर्त्यांनी हेवेदावे न करता जोमाने कामाला लागावे. गावागावांत नुक्कड सभा घेवून सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी व धानाला 2500 रूपयांचा भाव तसेच पक्षाद्वारे निर्दिष्ट समाज हिताचे कार्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावे. कार्यकर्त्यांनी सशक्त पक्षबांधणी करावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी विजय शिवणकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जामखारी येथील भोलागिरी भृगुलास्तव (गिरी महाराज) यांच्या निवासस्थानी पदमपूर जिल्हा परिषद अंतर्गत गोरठा पंचायत समिती क्षेत्रातील पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, जिल्हा परिषद सदस्य सुकराम फुंडे, सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, सहकार सेल अध्यक्ष टिकाराम मेंढे, महिला तालुकाध्यक्ष अंजली बिसेन, जिल्हा उपाध्यक्ष कविता रहांगडाले, किसान सेल अध्यक्ष तुकडू रहांगडाले, ओबीसी सेल अध्यक्ष सुभाष यावलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेला उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संचालन अजय बिसेन यांनी केले. आभार सुभाष यावलकर यांनी मानले. सभेला तुलेंद्र कटरे, भोलागिरी भृगुलास्तव, संतोष श्रीखंडे, युवक शहार अध्यक्ष आनंद शर्मा, अजय बिसेन, लखन चुटे, प्रदुमन महारवाडे, सुकाजी करर, महेंद्र येडे, डिलीराम पटले, तेजराम भांडारकर, जियालाल बिसेन, अनिल येडे, देवेंद्र मडावी, अशोक येडे, योगराज बिसेन, संजय वासनिक, सीताराम वंजारी, छागनलाल मेश्राम, बाबूलाल भोंडे यांच्यासह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.