नगराध्यक्ष खासदार मेंढेच्या गैरप्रकाराविरोधात भाजप नगरसेवक धकातेंचा एल्गार

0
655

भंडारा,दि.24ः  भंडारा नगरपरिषदेचे अध्यक्ष व भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल मेंढे यांच्या भ्रष्टाचार व गैरप्रकाराविरोधात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितिन धकाते यांच्यासह प्रबुध्द नागरिकांनी मोर्चा काढून आज(दि.24)भंडारा नगरपरिषद कार्यालयासमोर निदर्शेने केली.तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी सहकार्य करुन भंडारा नगरपरिषदेतील विविध घोटाळ्यांची चौकशी करण्याचे निवेदन सादर केले.

नगरसेवक नितीन धकाते यांनी निवेदनाच्या माध्यमातून  नगराध्यक्ष व खासदार सुनिल मेंढे यांनी नगर परिषद भंडाराकडून अवैध नियमबाह्य बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम केल्याचे म्हटले आहे.यासंबंधात नगर रचनाकार भंडारा यांनी दिनांक 25 मे 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अहवाल सादर करून नगर परिषद भंडाराने नगराध्यक्ष सुनील बाबुराव मेंढे यांनी नियमांचा भंग करून परवानगी दिल्याचे नमूद केले आहे.नगराध्यक्ष पदावर राहून स्वहितासाठी अशा परवानग्या आपल्या पदाचा दुरुपयोग करून काढून घेतल्याचे म्हटले गेले आहे.तर सन 2017-18 ते सन 2019-20 या कालावधीत नगर परिषद अध्यक्ष सुनील बाबुराव मेंढे यांच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा आदित्य पंधरे यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचे बांधकामाचे देयके अदा करण्यात आले असून तीन वर्षाच्या निविदा संशयास्पद असल्यान या सर्व कामांचे अंदाजपत्रकासह सर्व प्रकियेची सखोल चौकशी व्हावी.शहरात होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या शासनाकडून मंजूर प्लॅनमधील राखीव आरक्षित जागांवर जसे शाळा,खेळांचे मैदान,हुतात्मा स्मारक असे त्यांचा वापर बदलण्याचे कारवाई न करता बांधकाम करण्यात आल्याचे म्हटले आहे.या जागेवर पाण्याची मोठी टाकी व इतर बांधकाम सुरू असून नगरपरिषदेकडून या सर्व कामांना तांत्रिक मंजुरी तसेच प्रशासकीय मान्यता घेताना सदर जागा आरक्षणात असल्याची बाब लपवून त्यांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्यात आल्याचे म्हटले असून या सर्व नियमबाह्य कामाची सखोल चौकशी करण्यात यावे.भंडारा शहरात स्मशानघाट हा क्षेत्र पूरग्रस्त आरक्षणाखाली येत असून तेथे अंदाजे पाच कोटी रुपयाचे बांधकाम सुरू आहे.पूरग्रस्त असलेला भाग आरक्षणाखाली येत असलेल्या जागेवर कोणतेही शासकीय बांधकाम करता येत नाही अशा स्थितीत नगराध्यक्षांनी स्वहितासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन बांधकाम करण्याची निविदा मंजूर केल्याचे म्हटले आहे.भंडारा नगरपरिषदेच्या डम्पिंग यार्डमध्ये सुरू असलेल्या बांधकामात नगराध्यक्षांचे हितसंबंध व वैयक्तिक स्वार्थ असल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सदरचे कामावर त्यांचे खासगी कर्मचाऱ्यांच्या नावावर असलेली जेसीबीमशीन घटनस्थळावर दिसून येत असल्याने त्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी.शहरातील गांधी चौक येथे झेंडा उभारणीच्या कामाचीही चौकशी करण्यात यावे.नगरपरिषद अध्यक्ष व मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्यावर शहरातील नळाला घाण पाणी येणे,वसूल केले जाणारे घर टॅक्स, पाणीपुरवठा योजनेनिमित्त शहरातील ठिकठिकाणी खोदलेले खड्डामुळे नागरिकांना भयंकर त्रास होत असल्याने याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावरकारवाई करण्यात यावे असे अनेक मुद्दे आज नगरसेवक धकाते यांच्या नेतृत्वातील मोर्च्याने केली आहे. तसेच  भंडारा नगरपरिषद अध्यक्ष सुनील बाबुराव मेंढे यांना पदावरून तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.मोर्चाचे नेतृत्व नगरसेवक नितीन धकाते व समाजसेवक लोकेश उर्फ सोनुभाऊ खोब्रागडे यांनी केले. सारंग चकोले, प्रमोद केसलकर, सचिन घनमारे, संजय मते, शुभम सावरबांधे, सचिन सेलोकर, प्रकाश फुळसुंगे, अरविंद लांजेवार, विक्रम धाबेकर, प्रवीण वडतकर, अरविंद पडोळे, सचिन फाले, विनय मोहन पशिने, शमीम शेख, शुभम गडकरी, मोहित गडकरी, भावेश रामटेके, चंदू उमाळकर, अमोल गुलाने, तेजस कडू, कमल साठवणे, जीवन जी भजनकर इद्यादी उपस्थित होते.