सत्-असत् प्रवृत्तींचा संघर्ष हाच अश्रूंची झाली फुले या नाटकाचा खरा विषयसूत्र: डाॅ. विजय रैवतकर

0
435

गोरेगाव,दि.24- आजच्या समाजजीवनातील सत्-असत् प्रवृत्तींचा संघर्ष हाच वसंत कानेटकर लिखीत ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा खरा विषयसूत्र व केद्रबिदू आहे असे प्रतिपादन जगत कला,वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे ‘मराठी वाङमय मंडळव्दारा’ आयोजित ‘अश्रूंची झाली फुले:आकलन आणि आस्वाद’ या व्याख्यानात महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरीचे प्रा. डाॅ. विजय रैवतकर यांनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.एस. एस .भैरम तर प्रमुख उपस्थितीत मराठी विभागप्रमुख डाॅ. चंद्रकुमार राहुले,ग्रथंपाल प्रा.एकनाथ चंदनखेडे, प्रा. लोकेश कटरे, विजय हरिणखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
पुढे विचार मांडतांना डाॅ. रैवतकर म्हणाले की, शिक्षणबाह्य हेतु मनाशी बाळगून धनिकांनी शिक्षण संस्था उभारल्या व या धनिकांच्या स्वार्थापायी बुद्धीवान मंडळी शिक्षण क्षेत्रापासून दूर फेकले जात आहेत. अध्यक्षीय भाषणातून उपप्राचार्य डाॅ. एस. एस.भैरम यांनी संवाद हा नाटकाचा शरीर आहे तर संघर्ष हा नाटकाचा आत्मा आहे अशाप्रकारचे मौलिक विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. चंद्रकुमार राहुले यांनी तर संचालन प्रा. लोकेश कटरे व आभार प्रा. एकनाथ चंदनखेडे यांनी मानले. या कार्यक्रमात प्रा. उमेश राणे, प्रा. जय कटरे तसेच महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.