गोंदिया जिल्ह्यात अवकाळीपावसासह गारपीट

0
357

गोंदिया,दि.24ः-जिल्ह्यात आज (दि.24)सायकांळी 7 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे जनजिवनविस्कळीत झाले असून पावसासोबत पडलेल्या गारांमुळे पिकांचे तसेच आंब्याच्या मोहर व कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सलग 10 ते 25 मिनिटे पडलेल्या गारपीटीमुळे पक्ष्यांनाही मृत्यू ओढवले आहे.अचानक विजेच्या गडगडाटासह आलेल्या या पावसाने शहरातील जनजिवन काही वेळासाठी विस्कळीत करुन ठेवले होते.त्यातच विजेचा लंपडाव सुरु झाल्याने रात्री 10 वाजेपर्यंत विजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.ग्रामीण भागात विजपुरवठा वृत्त लिहिपर्यंत खंडीतच होता.तर पावसाने मात्र उसंत घेण्याएैवजी विजेच्या गडगडाटासोबत हजेरी सुरुच ठेवली आहे.याअल्प पावसाने गोंदिया नगरपरिषदेची पुन्हा पोलखोल केली असून सांडपाणी वाहून जाणार्या नाल्यातील पाणी रस्त्यावर साचल्याने नगरपरिषदेच्या स्वच्छता अभियानाची पोलखोल केली.आमगाव तालुक्यातील गावांना सुधा गारांचा मोठा तडाखा बसला असून घराचे छप्परे कव्हेलूचे नुकसान झाले आहे. आंब्याचे मोहर,गहू,चना,बागायती शेतीचा मोठे नुकसान झाले आहे.