दारुविकेत्याकडून १ हजाराची लाच घेणारी पोलिस पाटील एसीबीच्या जाळ्यात

0
244

गडचिरोली,दि.२५: दारुविक्रेत्यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई न होऊ देण्यासाठी त्याच्याकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरमोरी तालुक्यातील वासाळा येथील पोलिस पाटील ज्योती विजयकुमार मेश्राम(४५) हिला रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा दारुविक्रेता आहे. त्याला दारुचा व्यवसाय सुरळीत करु देण्यासाठी, तसेच पोलिसांकडून कुठलीही कारवाई न होऊ देण्यासाठी पोलिस पाटील ज्योती मेश्राम हिने त्यास १ हजार रुपयांची लाच मागितली. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. यावेळी पोलिस पाटील ज्योती मेश्राम हिला तक्रारकर्त्याकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तिच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक यशवंत राऊत, सहायक फौज्दार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, पोलिस नाईक सतीश कत्तीवार, देवेंद्र लोनबले, शिपाई किशोर ठाकूर, घनश्याम वडेट्टीवार, सोनल आत्राम यांनी ही कारवाई केली.