गडचिरोली,दि.25 – जनादेशाचा अनादर करून सत्तेवर आलेल्या शिवसेना- राष्टÑवादी कॉंग्रेस ’कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारने शेतकºयांची फवणूक केली असून महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवर अत्यावर वाढले आहेत. या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्ह्यातील आज २५ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्टÑ सरकारच्या घोषणेप्रमाणे शेतकºयांना सरकार कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्यात यावा, घोषणेप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकºयांना २५ हजार हेक्टरी, फळबाग शेतकºयांना ५० हजार हेक्टरी मदत देण्यात यावी, महिलांवरील अत्याचार थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी, जलयुक्त शिवार योजना पूर्ववत चालु करण्यात यावी, नोकर भरती पोर्टल पुर्ववत चालु करण्यात यावे, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा, बींदू नामावली स्थगिती उठविण्यात यावी, ओबीसींना पूर्ववत १९ टक्के आरक्षण देण्यात यावे, थेट जनतेतून सरपंच/नगराध्यक्ष निवडण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
गडचिरोली- येथील धरणे आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्षा योगिता पिपरे, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, भाजपा शहाराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, भाजपा तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, उपसभापती विलास दशमुखे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, नगरसेवक केशव निंबोड, माजी शहराध्यक्ष सुधाकरराव येंनगधलवार, माजी तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, नगरसेविका अल्का पोहनकर, अनिता विश्रोजवार, वर्षा बट्टे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष दुर्गा मंगर, महिला आघाडी शहराध्यक्ष पल्लवी बारापात्रे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, सिध्दार्थ नंदेश्वर, गजेंद्र मेश्राम, नरेश हजारे, लता लाटकर, निलीमा राऊत, अविनाश विश्रोजवार, देवाजी लाटकर, गोवर्धन चव्हाण, डेडूजी राऊत, युवराज बोरकुटे, लोमेश नामदेव कोलते, हेमंत बोरकुटे, उपेंद्र रोहणकर, रामन्ना बोनकुलवार, प्रतिभा चौधरी, पुनम हेमके यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.