सटवा येथे विविध विकास कामांसाठी 15 लाखांचा निधी मंजूर

आमदार विजय रहांगडाले यांचे ग्राम विकास मंडळाने मानले आभार

0
124

गोरेगाव,दि.27- तालुक्यातील सटवा येथे आमदार विजय रहांगडाले यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांसाठी 15 लाखांचा निधी मंजूर केल्याची घोषणा सटवा येथे आयोजित कार्यक्रमात केली. आमदार विजय रहांगडाले यांचे ग्राम विकास मंडळाने आभार मानले आहे. मागील काही वर्षांपासून सटवा येथे सीमेंट रस्ता बांधकाम व तलाव सुशोभिकरणासाठी निधी मंजूर करण्यासाठी आमदार विजय रहांगडाले यांना ग्राम विकास मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. आमदार रहांगडाले यांनी निवेदनाची दखल घेत सटवा येथील स्कूलटोली मध्ये दशरथ मडावी यांच्या घरापासून ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत 10 लाख रुपये लागतीच्या सीमेंट रस्ता बांधकाम तसेच गाव तलावाच्या सुरक्षा भिंतीसाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. आमदार रहांगडाले यांच्या या कार्यासाठी ग्राम विकास मंडळाच्या वतीने सरपंच विनोद पारधी, माजी सरपंच रमेश ठाकूर, डॉ. के.टी. कटरे, भागचंद रहांगडाले, उपसरपंच ओमप्रकाश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य गणराज रहांगडाले, ओमेंद्र ठाकूर, देवकांत ठाकूर, नितीन कटरे, धर्मराज ठाकूर, तेजराम रहांगडाले आदींनी आभार व्यक्त केले आहे.