स्पर्धा मार्गदर्शन वअभ्यासिका केंद्रासाठी 10 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित

0
380

भंडारादि. 27 :- जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून सामाजिक न्याय भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्र 150 विद्यार्थी संख्येकरीता सुरु करण्यात आले आहे. अभ्यासिका केंद्रामध्ये एमपीएससी, युपीएससी, बँकींग व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करीता असणाऱ्या कोणत्याही पदवी शाखेतील 50 टक्के पेक्षा जास्त गूण असलेल्या विद्यार्थ्यांकरीता सत्र 2020-21 करीता नवीन सत्राची सुरुवात करण्यात येत आहे. सदर निवड ही गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. 15 मार्च 2020 रोजी चाळणी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याकरीता  https://drbrambedkarstudycenter.in/studycenter.aspx  या संकेतस्थळावर 10 मार्च पर्यंत फार्म उपलब्ध आहे. 12 मार्च 2020 पासून लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावरच विद्यार्थ्यांनाउपलब्ध होतील. संकेतस्थळावर फॉर्म भरण्यापूर्वी अभ्यासिकेतील कार्यालयात चाळणी परीक्षा शुल्क 100 रुपये भरुन त्याची रितसर पोचपावती घेवून पोचपावती संकेतस्थळावर अपलोड करणे अनिवार्य आहे.

भंडारा जिल्हयातील एमपीएससी, युपीएससी, बँकींग व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करीता असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने फॉर्म भरावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण भंडारा यांनी केले आहे. तसेच सदर चाळणी परीक्षेसंबंधी सर्व अधिकार समितीने राखून ठेवलेले आहे.