सालेकसा(पराग कटरे),दि.28ःउज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो, ही भावना ठेवत ‘फूल ना फुलाची पाकळीङ्क या माध्यमातून कार्य शिबिराच्या उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन गजानन ढोबळे यांनी केले. ते नेहरू युवा केंद्र गोंदिया, युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय व बोदलबोडी येथील स्वामी विवेकानंद युवा मंडळाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय कार्य शिबिर व जलशक्ती अभियान कार्य शिबिरात बोलत होते.
तालुक्यातील हलबीटोला येथील श्री अर्धनारीनटेश्वरालय शिवगन मंगल भवन येथे आयोजित या शिबिराच्या
अध्यक्षस्थानी प्रा. इंद्रकला बोपचेहोत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक सेवा केंद्राचे संचालक श्रीकृष्ण मेंढे,सामाजिक कार्यकत्र्या वंदना मेश्राम,अंकिता ढोबळे, सुनीता रहांगडाले, विश्वनाथ राणे उपस्थित होते.शिबिरामध्ये तालुक्यातील ५० युवक सहभागी झाले होते. शिबिरामध्ये परिसर स्वच्छता, जलशक्ती अभियान, पर्यावरण, ग्रामविकास, युवा नेतृत्व आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाव आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली. संचालन तालुका राष्ट्रीय युवा स्वयंसेवक मंगेश हत्तीमारे यांनी, तर आभार कमलेश पटले यांनी मानले. यावेळी प्रवीण मेंढे, मंगलदास मेंढे, नागरीकर, स्वामी विवेकानंद युवा मंडळ बोदलबोडी, जागृत युवा मंडळ गोविंदपूर, शिव युवा मंडळ सोनारटोला तसेच विविध मंडळांच्या सदस्यांनी सहकार्य
केले.