नवेगावबांध,दि.28ेः्र अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर हे गाव १९६९-७० मध्ये इटियाडोह धरणामुळे पुनर्वसित झाले. वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीवर ही वसाहत पुनर्वसित करण्यात आली.वसाहतीतील शेतकèयांना शेतजमिनी देण्यात आल्या. मात्र, ४५ वर्षे लोटूनही या गावात अंतर्गत पक्के रस्ते व नाल्या तयार करण्यात
आलेल्या नाहीत. आरोग्य, वीज, पाणी, शेतीसाठी सिंचन या सुविधांपासून आजही हे गाव कोसोदूर आहे. शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था नाही. वनविभागाकडून महसूल विभागाला या जमिनी आजही हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत. पुनर्वसनाचा कोणताही लाभ किंवा योजना या गावातील रहिवाशांच्या पदरात कधी पडल्याच नाहीत. या सर्व समस्यांना
घेऊन आणि अनेकदा शासनदरबारी अर्ज, विनंत्या करण्यात आल्या. याकडे सतत दुर्लक्ष केले गेले. या गावात विशेष निधी मंजूर करून व पुनर्वसनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करून आमच्या समस्यांची दखल घ्यावी, या
मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना दिले आहे. निवेदनानुसार, गाव वसाहतीचा
आबादी नकाशा तयार करण्यात यावा, गुरे चराईसाठी चराई जंगल मुक्रर करावे, झाशीनगर उपसा सिंचन लवकर सुरू करावे, पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी,कुटुंबातून एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन व तसा नियम असताना देखील झाशी नगरीतील अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम व पशुचिकित्सक यांची नियुक्ती करावी, आयुर्वेदिक दवाखान्यात डॉक्टरांची नियुक्ती करावी, गावांतर्गत रस्ते पूर्व-पश्चिम ५.६ किमी, उत्तर-दक्षिण ३.५ किमी असून या रस्त्यांचे बांधकाम व नाल्यांचे बांधकाम त्वरित करावे, आधारभूत धान खरेदी केंद्रांची स्थापना करावी, येथील शेतजमिनी वर्ग २ मरधून वर्ग १ कराव्या, झाशीनगर-तिडका या रस्त्याचे बांधकाम करावे, शेतकरी कर्ज घेतात व ते नियमित फेडतात अशा शेतकèयांना एक लाखाचा प्रोत्साहन लाभ द्यावा, प्रति कुटुंब दिवाबत्तीसाठी तीन लिटर रॉकेल देण्यात यावे, गावात ४ जी नेटवर्कची सुविधा देण्यात यावी, शेतकèयांना वीजजोडणी व डिमांड भरलेल्या शेतकèयांना लवकरात लवकर विद्युत मीटर देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना सरपंच दिलीप कोरेटी, सुदाम गुरुनुले, पतीराम भोगारे, शिवलाल कोरेटी, माजी पंस सभापती राऊत, रहिले उपस्थित होते.
यासंदर्भात जिप सदस्य किशोर तरोणे यांनी सांगितले की,इटियाडोह धरण बाधित असल्यामुळे झासीनगरचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसनाचे शासकीय निकष आहेत, त्यानुसार कुठल्याही सुविधा या गावाला आजपर्यंत देण्यात आल्या नाही.पंधराशे एकर जमिनीवर आजही वनविभागाची मालकी दाखविली जाते. त्यामुळे तेथील शेतकरी हा जमिनीचा मालक नसल्यामुळे अनेक सुविधांपासून वंचित आहे. त्यांचे वनहक्क दावे मंजूर होणे गरजेचे आहे. खासदार प्रफुल्ल पटेल व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या माध्यमातून झाशीनगरच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.