लाखनी,दि.28ः-द लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल लाखनी येथे मराठी राजभाषा दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या आशा वनवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून अल्का खटके, आशिष बड़गे, विद्या फरांडे उपस्थित होते.आज जगात अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक भाषा आज शिकवल्या जातात मात्र माय मराठी ही आपल्या हृदयाला भिडनारी भाषा आहे, आपली मातृभाषा आहे. मराठी बोलत असताना किंवा मराठीमध्ये व्यक्त होत असताना आपन मनापासून व्यक्त होऊ शकतो. जगाच्या स्पर्धेत राहत असताना आपल्याला इंग्रजी, हिंदी या भाषा यायला हव्यात मात्र व्यवहारात किंवा सर्व ठिकाणी आपन आपल्या मातृभाषेचा वापर केला पाहिजे. अनेक लेखक, कवि साहित्यिक यांनी मराठी भाषेला मोठं साहित्य दिलेलं आहे. त्यांचं वाचन आपन करायला पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी शाळेच्या प्राचार्य आशा वनवे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कवि कुसुमाग्रज लिखित मराठी काव्यवाचन केले, मराठी भाषेतील काही सुंदर गितगायन केले तसेच एक लघुनाट्य सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाक्षी डोरले यांनी तर प्रास्ताविक वर्षा पंचबुद्धे यांनी केले आणि आभार प्रदर्शन शिल्पा कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.