ओबीसींची जातनिहाय जनगणना करा आ.अग्रवालांचा विधानसभेतील चर्चेत सहभाग

0
349
गोंदिया,दि.28ः: मागील अनेक वर्षांपासून ओबीसींची जनगणना व्हावी अशी मागणी सातत्याने होत आहे.त्यातच आमच्या गोंदिया जिल्ह्यात सुध्दा ओबीसींची जनगणना व्हावी याकरीता जनजागृती अभियान यात्रा राबविण्यात आली असून आपण मागच्या विशेष अधिवेशनात ओबीसींची जनगणना व्हावी असा ठराव देखील  विधानसभाध्यक्ष या नात्याने मांडलात.आपल्या माध्यमातून ओबीसींची जनगणना व्हावी त्या समाजाच्या विकासासाठी आवश्यक असून जिल्ह्यात जनगणनेत काॅलम नसल्यास बहिष्काराची भाषा वापरली जात असल्याने जनगणना न झाल्यास अन्याय होऊ शकते त्यामुळे जनगणना करण्यात यावी अशी मागणी गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आज विधानसभेत ओबीसी जनगणनेवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या निवेदनानंतर चर्चेत सहभागी होत केली. गेल्या अनेक वर्षापासून जनगणनेची मागणी आहे त्यातच महाराष्ट्राने जनगणना करण्याचा ठराव पारित केल्यामुळे ओबीसीं वर्गातील जातींमधील लोकांच्या आशा पुनः पल्लवित झाल्या आहेत की या वेळेस आपली जनगणना जातीनिहाय होईल.परंतु केंद्राच्या उत्तराने समाजात नाराजी पसरली असल्याने समाजाची जनगणना करण्यात यावी या विषयावर गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी विधानसभेत चर्चेत आवाज उठवला आणि ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनाच्या बाजूने उभे राहिले.गोंदिया जिल्ह्यातील अनेक घटक ही मागणी उचलत असून त्यांच्या मागण्या ह्या वाजवी आहेत.ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नाही तर जनगणनेवर बहिष्कार तसेच सहकार्य करणार नाही अशा प्रकारची भावना ओबीसी बांधवांमध्ये निर्माण झाल्याचे सुद्धा यावेळी विधानसभेत बोलतांना सांगितले.