जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा शुभारंभ

0
347

गडचिरोली,दि.28:- जिल्हा परिषदेच्या क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचा शुभारंभ जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली व अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, उपाध्यक्ष  मनोहर पोरेटी , श्रीमती, रंजीता कोडापे , श्रीमती रोशनी पारधी , रमेश बारसागडे , श्रीमती लताताई पुंगाटे, जि.प. सदस्या, प्रल्हाद कराडे , मारोतराव इचोडकर   सर्व जिल्हा परिषद  सभापती  जि.प. सद्स्य   व   जि.प. अधिकारी   जिल्हयातील सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी यांनी खेळाडुंना शुभेच्छा देवून त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, खेळामुळे नवी ऊर्जा मिळते. या खेळातूंन मोठया प्रमाणात ऊर्जा तयार झाल्यानंतर त्याचा वापर प्रशासकीय कामकाजात करा. मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी व्यायामबरोबरच मैदानीखेळ होणे गरजेचे आहे. उद्घाटनपर भाषणात अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी खेळ भावनेने या स्पर्धा पाडाव्यात व खेळाडूवृत्ती जपावी अशा सूचना केल्या. ते म्हणाले याबाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा या स्पर्धेबाबतचा आलेला प्रस्ताव पदाधिकारी यांनी मान्य केला. अशा प्रकारच्या सर्व समावेसक स्पर्धा पहिलांदाच आपला जिल्हा परिषदेमध्ये पार पाडल्या जात आहेत. याचा आंनद घ्या. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले पोलीस अधिक्षक यांनी खेळामुळे मानासिक तान कमी मदत होते. दररोजच आपण काही प्रमाणात मैदानी खेळ खेळल्यास ताणतणावर नियंत्रण मिळवता येते.

या कार्यक्रमात क्रिकेट , व्हॉलीबॉल, रस्सीखेच , लांब ऊडी, कबड्डी अशा खेळांच्या समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले तर आभार सामान्य प्रशासन उप मुख्यकार्यकारी अधिकारी कुतरीकर यांनी मानले.