तुमसर,दि.29 : तालुक्यातील तुडका येथे लागलेल्या आगीत दोन घरे जडून खाक झालीत. या आगीत जवळपास पाच लाख रूपयांचे नुकसान झाले असून दोन्ही कुटुंबातील ६ जण थोडक्यात बचावले. सदर घटना२८ पेâबु्रवारीला पहाटे उघडकीस आली.
तुडका येथील विलास पूâलचंद सा’वणे व विनोद पुâलचंद सा’वणे या दोन्ही भावाची घरे एकमेकांना लागून आहे. दोघेही शेतकरी आहेत. दि.२७ पेâबु्रवारी रोजी रात्री चुलीवर स्वयंपाक करून जेवन केल्यानंतर झोपी गेले. विस्तवाच्या ‘िणगीने घराला आग लागली. आगीने संपूर्ण घराला कवेत घेऊन लागून असलेल्या घरालासुद्धा आगीने कवेत घेतले पाहता पहात आगीने रौद्र रूप धारण केले. त्यावेळी दोन्ही कुटुंब गाढ झोपेत होते. शेजाNयांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरड करून दोन्ही कुटुंबातील ६ जण थोडक्यात बचावले. गावकNयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. नगर परिषद तुमसर येथून अग्निशमन दल बोलविण्यात आले. त्यांनी घटनास्थळी जावून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मो’ा अनर्थ टळला. आगीत सा’वणे कुटुंबियांचे जीवनावश्यक वस्तू, लावूâड फाटा, दागदागीने, रोख रक्कम व इतरही साहीत्य जळून खाख झाले.
दोन महिन्यांअगोदर याच तुडका गावात ६ घरांना आग लागलेली होती. घरांचे मो’्या प्रमाणात नुकसान झाले होते. अद्यापर्यंत त्या कुटुंबाला शासनाकडून घरवूâल व मदत देण्यात आली नाही. आज पून्हा दोन घरांना आग लागल्याने तुडका गावात आगीला पुन्हा उजाळा मिळ्याल्याची चर्चा गावकNयांत केली जात आहे. आगग्रस्त घरांचा पंचनामा करण्यात आला. ५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.