गडचिरोलीतील यावर्षीचा ग्रंथोत्सव १९ व २० मार्चला

0
75

गडचिरोली,दि.29 : जिल्हयातील यावर्षीचा ग्रंथोत्सव २०१९ चे आयोजन १९ व २० मार्च रोजी करण्याचे नियोजन जिल्हास्तरीय समितीचया बैठकित करण्यात आले. निवासी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन बैठकीत ग्रंथोत्सवाच्या अंमलबजावणीबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा ग्रंथालय अध्यक्ष जगदीश श्रीहरी मस्के, शिक्षण विभाग माध्यमीक अमरसिंग गेडाम, राज्य ग्रंथालय संघ सदस्य भाऊराव पत्रे, लेखक बंडोपंत बोढेकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आर.जी.कोरे, ग्रंथालय विभाग सुर्यकांत भोसले हे उपस्थित होते.

या वेळी ग्रंथ दिंडी व ग्रंथोत्सवाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार असल्याचे ठरविण्यात आले. या ग्रंथोत्सवात वेगवेगळया ग्रंथांची व पुस्तकांची मेजवानी असणार आहेच, त्याचबरोबर कथाकथन, वाद विवाद, कवी संमेलन, व्याख्याने आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यावषी विशेष करून पर्यावरण, आदीवासी संस्कृती, युवा वर्गाला संदेश अशा संकल्पनांवर आधारीत विषयांचा समावेश करण्याचे ठरविण्यात आले आहे.