बृहन्मुंबई पोलिस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची निवड

0
102

मुंबई,दि.29 – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह, यांची बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे आज सेवानिवृत्त होत असल्याने होणाऱ्या रिक्त पदावर सिंह यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सिंह हे भारतीय पोलीस सेवेच्या सन 1988 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. परमबीर सिंह अंडरवर्ल्ड स्पेशलिस्ट म्हणून देखील ओळखले जातात.

एटीएसमध्ये आयजी राहिलेले आहेत परमबीर

परमबीर एटीएसमध्ये डिप्टी आयजी पदावर कार्यरत राहिले आहेत. त्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड चांगला आहे. त्यांनी चंद्रपूर आणि भंडारा जिल्हा पोलिस अधिकक्षकाच काम पाहिले आहे. मुंबई पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत परमबीर यांच्यासह पुणे पोलिस आयुक्त के वेंकटेशम आणि 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी रजनीश शेठ यांचे नाव होते.