कोर्ट परिसरात मोबाईलवर गाणे वाजविणे पडले महागात

0
150
देवरी,दि.29- देवरीच्या न्यायालय परिसरात एका फौजदारी प्रकरणात तारखेवर आलेल्या एका आरोपीला कोर्ट परिसरात मोबाईलवर गाणे वाजविणे चांगलेच महागात पडल्याची घटना आज शनिवारी (दि.29) घडली. दरम्यान, देवरीचे प्रथम श्रेणी न्यायाधीश शेख मोहम्मद वसीम अक्रम मोहम्मद जलालुद्दीन यांनी सदर आरोपीला 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिचगड पोलिसांनी दाखल केलेल्या एका गुन्हातील आरोपी रामेश्वर लालाजी बर्वे, राहणार ककोडी हा आज तारीख असल्याने देवरीच्या कोर्टात पेशीवर आला होता. दरम्यान, कोर्ट सुरू असताना रामेश्वर हा कोर्ट परिसरात मोबाईलवर गाणे वाजवित होता. यामुळे न्यायाधीसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. आरोपीने कोर्टाला मोबाईल परत मिळण्यासाठी अर्ज केला होता. यावर न्यायाधीसांनी त्याला 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निकालामुळे मोबाईल शौकिनांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.