भोपाळ,(वृत्तसंस्था)दि.01- एनटीपीसीच्या कोळसा वाहून नेणार्या 2 मालगाड्यांचा आज(रविवार) समोरा-समोर भीषण अपघात झाला. अपघातात 3 लोको पायलट्सचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही मालगाड्यांचा समोरचा भाग चकनाचुर झाला आहे. टक्कर झाल्यानंतर अनेक डब्बे पटरीवरुन खाली उतरले.रेल्वे सूत्रांनी सांगितले की, उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमधील राष्ट्रीय ताप विद्युत निगम (एनटीपीसी) च्या रिंहदमध्ये कोळसा रिकामा करुन मालगाडी परतत होती. तर दुसरी मालगाडी सिंगरौलीच्या अमरोली एमजीआरमधून कोळसा घेऊन जात होती. सिंगरौलीच्या बैडन परिसरातील गनियारीमध्ये दोन्ही गाड्यांची 4 वाजता जोरदार टक्कर झाली. सकाळी 10 वाजता दोन्ही मालगाड्यांमध्ये अडकलेल्या मृतदेहांना काढम्यात आले. घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांनी जोरदार हंगामा सुरू केला. त्यांनी बेजबाबदार कर्माचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्यांच म्हणने आहे की, एकाच ट्रॅकवर दोन मालगाड्या कसकाय धावत होत्या?
रेल्वे विभागाची जबाबदारी नाही
रेल्वे कर्मचारी ट्रॅक मोकळा करण्याच्या कामात लागले आहेत. सिंगरौली जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. येथील कोळसा भरुन मालगाड्या रिंहद एनटीपीसी परिसरात पाठवल्या जातात. रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, हा ट्रॅक पूर्णपणे एनटीपीसीच्या अंडर येतो, त्यामुळे आमची जबाबदारी नाहीये.