ओबीसी समाजाने येणाऱ्या जनगणनेवर बहिष्कार टाकावा

0
90

चंद्रपूर,दि.02 : मोठ्या प्रमाणात असलेल्या ओबीसी समाजाकडे शासनस्तरावर दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यांच्या हक्कावर गदा आणू पहात असल्यामुळे आता समाजाने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची जनजगणा न केल्यास जनगणनेवर बहिष्कार टाकून असहकार करा, असे आवाहन डॉ. समीर कदम यांनी केले. ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या वतीने स्थानिक मातोश्री मंगल कार्यालयात ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराज धोटे होते. यावेळी उद्घाटक म्हणून अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते उपस्थित होते.

यावेळी दिनेश पारखी, प्रा.सूर्यकांत खनके, डॉ.सचिन भेदे, डॉ.राजू ताटेवार, अजय मार्केंडेवार, दीपक जेऊरकर, प्रा. ज्योती राखुंडे, डॉ. तुषार मारलावार, वंदना हाटगावकर, डॉ. अभिलाषा गावतुरे, अरुण धानोरकर, पंकज संगीडवार, दिनेश एकवनकर, राजू लाडे, अशोक आक्केवार, वासुदेव बरडे, विवेक आबोजवार, विजय पोहनकर, विश्वनाथ मुके, धनंजय बोरकर, ओमप्रकाश अंगलवार, भूषण धामंदे, गजानन जवळे, अमोल बावणे, राजेंद्र रघाताटे, गजानन उरकुडे, अमित साळवे, रतन शिलावार, इरफान शेख, संजय कन्नवार, नामदेव पवार, किशोर घनकसार, अशोक जाधव, प्रगती कथाले आदींची उपस्थिती होती. यावेळी बळीराज धोटे, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपूते यांच्यासह उपस्थितांनी मार्गदर्शनामध्ये ओबीसी समाजावर आजपर्यंत अन्याय करण्यात आला आहे. जनगणनेअभावी नेमकी ओबीसी संख्या किती हे समजू शकत नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभापासून हा समाज वंचित आहे. त्यामुळे आता जोपर्यंत जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा कॉलम जोडण्यात येणार नाही तोपर्यंत सर्व समाजाने यावर बहिष्कार टाकावा असे आवाहन करून भविष्यात हा लढा अधिक तिव्र करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ओबीसी जाती समुदायातील संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक विजय मुसळे, संचालन अविनाश आंबेकर तर आभार प्रा. माधव गुरनुले यांनी मानले.