खंजेरी भजन स्पर्धेमध्ये सेंदुरवाफाचे भजन मंडळ ठरले अव्वल

0
98

नवेगावबांध(सतीश कोसरकर),दि.02ः-महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर नवेगावबांध येथे भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये सेंदुरवाफा येथील सावता माळी पुरुष भजन मंडळाने सोळा भजन मंडळात ङडन सादर करुन अव्वल स्थान पटकावले.विजेत्यांना जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच रघुनाथ लांजेवार,ज्येष्ठ नागरिक सिताराम पर्वते, खुशाल काशिवार, अण्णा पाटील डोंगरवार, अशोक खांडेकर,सतीश कोसरकर,धनराज डोंगरवार,होमराज पुस्तोडे, गुलाब डोंगरवार,किसन डोंगरवार आदीं उपस्थित होते.

तर पुरुष गटातील द्वितीय क्रमांक गुरुदेव भजन मंडळ बेंबाळ यांनी व तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री गुरुदेव भजन मंडळ सातलवाडा, चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ निफांद्रा तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस बालगणेश भजनी पांढरवाणी रैय्यत यांनी पटकावले. सदर गटांमध्ये एकंदर 10 बक्षीस मंडळाच्या वतीने देण्यात आले.पुरुष गटामध्ये एकंदर सोळा मंडळे सहभागी झाली होती.महिला गटातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस श्री गुरुदेव महिला भजन मंडळ आष्टीने, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस साई लक्ष्मी भजन मंडळ सेंदुरवाफा, तृतीय क्रमांकाचे बक्षीस मातोश्री महिला भजन मंडळ अर्जुनी-मोर, चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस सावित्रीबाई फुले भजन मंडळ लवारी तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस जय कोकणाई माता भजन मंडळ कवठा यांनी पटकावले. सदर गटांमध्ये एकंदर सात बक्षीस मंडळाच्या वतीने देण्यात आले.महिलांचे अकरा भजनी मंडळ सदर स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.या स्पर्धेचे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सायंकाळी सात वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी एक वाजेपर्यंत अखंड भक्ती भावाचा व सामाज प्रबोधनाचा गजर अविरत एकोणवीस तास सुरू राहिला.
राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रचार प्रसार भजनाच्या माध्यमातून होणे हे उत्कृष्ट कार्य आहे.आजच्या युवा पिढीने समाज प्रगती साठी संतांचे विचार अगीकारावे व संतांच्या शिकवणीनुसार अंधश्रद्धा जातिभेद धर्मभेद सोडून मानव धर्माचे पालन करावे हेच खरे समाजपरिवर्तनाचे कार्य आहे असे विचार बक्षीस वितरण प्रसंगी किशोर तरोणे यांनी व्यक्त केले.सदर भजन स्पर्धेचे आयोजन अटल अभिनव सहकारी संस्था नवेगावबांधच्यावतीने संपूर्ण ग्रामस्थ पुरुष व महिला भजनी मंडळ यांच्या सौजन्याने पार पडले.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन बाळकृष्ण कापगते यांनी तर आभार मंडळाच्यावतीने सचिव अशोक परशुरामकर यांनी मानले.यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र कापगते,मुकेश पहाडे,अरविंद ठाकरे,शत्रुघन डोंगरवार,विनय चांडक,रवी मस्के,गुरुदेव इसकापे,रामू फरदे,गणेश डोंगरवार,राजू डोंगरवार,राजू मडावी,जनार्दन गजपुरे,भगीरथ डोंगरवार,प्रवीण गजापूरे,गुलाब करंजेकर,विकास नाकाडे,गंगाधर डोंगरवार,जगदीश डोंगरवार,संदीप डोंगरवार,शैलेश कापगते तसेच मंडळाचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले.