श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

0
87

वाशिम, दि. ०२ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने श्री रामाराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयश्री देशमुख होत्या.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, प्रा. गजानन बारड, प्रा. गजानन हिवसे, प्रा. दिपाली देशमुख, प्रा. मंगेश भुताडे, प्रा. पंढरी गोरे, प्रा. मनीषा कीर्तने, प्रा. डॉ. संजय साळवे, प्रा. प्रसेनजीत चिखलीकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी आयोजित कवी संमेलनात कवी शुद्धोधन अवचार यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. मराठी वाडमय मंडळाचे संयोजक प्रा. बारड यांनी वर्षभरातील विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत आयोजित ‘विवाहपूर्व समुपदेशन काळाची गरज’ या निबंध स्पर्धेत संदेश राठोड, मेघा दळवी व सोपान पवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्राधिकरणचे सचिव श्री. देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी भाषेचे महत्व, मराठी भाषेचा नियमित वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.सूत्रसंचालन कल्याणी कांबळे यांनी केले, आभार एकता राठोड यांनी मानले.