खेमेंद्र कटरे
गोंदिया -थायलंडची भ्रमंती करून १७ मार्चला एक युवक रायपूर मार्गे गोंदिया पोचतो. २५ मार्चला त्याला जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण केंद्रात दाखल व्हावे लागते. तिथून त्याची १० एप्रिल रोजी सुटका होते. सर्व रिपोर्ट नार्मल येतात. तरीही स्वतःची जबाबदारी जाणून त्याने स्वतःला ९ मे पर्यंत घरात स्वतःला कोंबून घेतले. आपल्यामुळे कुटुंबीय असो वा इतरही यांना उगीचच त्रास नको म्हणून फिजिकल डिस्टेंqसगचे त्याने काटेकोर पालन केले. या सर्व प्रक्रिया त्याने परिस्थितीचे भान ठेवत पूर्ण केल्या. आणि अखेर २८ दिवसांची लढाई qजकून घराबाहेरील Ÿविश्व बघण्यासाठी तो बाहेर आला.
ही गोष्ट आहे ती गोंदियातील एका युवकाची. विश्वभ्रमणासाठी थायलंड येथे गेलेला हा युवक रेल्वेने रायपूर मार्गे १७ मार्च रोजी गोंदिया गाठले. त्याला कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला संशयित रुग्ण म्हणून २५ मार्चला जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. रुग्णालयातून १४ दिवसाच्या विलगीकरण प्रक्रिया पूर्ण करून त्याला १० एप्रिलला घरी पाठवण्यात आले. तेव्हापासून त्याने स्वतःला घरीच होम क्वारंटाईनमध्ये ठेवले. तब्बल २८ दिवस तो इतरापासून लांब राहिला. याकरिता घरीच राहून सुद्धा फिजिकल डिस्टंqसगचे काटेकोर पालन केले. आपल्या स्वतंत्र खोलीत ती दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम बघून वेळ काढायचा. होम क्वारटांईन असताना सतत १४ दिवस रुग्णालयातील डॉक्टर सकाळी घरी येऊन त्याची तपासणी करायचे. या काळातही डॉक्टरांनी त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्याचे सांगितले. सांगितलेल्या नियमांचे त्याने काटेकोर पालन केले. आपल्यापासून कोणालाही त्रास होणार नाही, याची त्याने खबरदारी घेतली. मात्र, असे असले तरीही सोशल मिडियावर त्याच्याबद्दल अनेक अफवा प्रसारित करण्यात आल्या. अशा अफवांवर अंकुश लावण्यासाठी तो सतत जिल्हाधिकारीपासून सर्वांच्या संपर्कात होता. रुग्णालयातील १४ दिवस आपल्यासाठी खूप काही शिकवण देणारे ठरल्याचे तो करोना बाधित युवक आता सांगतो आहे.
दरम्यान, हा युवक ज्या लोकांसोबत थायलंडवरुन परतलेला होता, त्यापैकी काही करोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना राजनांदगाव येथे क्वारटांईन करण्यात आले होते. त्या क्वारटांईन झालेल्या रुग्णांच्या माहितीवरून येथील जिल्हाप्रशासन सजग झाले. त्यातच गोंदियातील पॉझिटिव्ह आलेल्या या रुग्णालाही २५ मार्चला आपल्यापैकी एक सहकारी राजनांदगाव येथे पॉझिटिव्ह आल्याचे कळताच केटीएस रुग्णालयाच्या डॉक्टरांना माहिती दिली आणि त्यांनी त्याला लगेच शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले. विशेष म्हणजे गोंदियातील जो युवक पॉझिटिव्ह आढळून आला होता, त्याला कुठलेही कोरोनाचे लक्षण आढळले नव्हते. परंतु, घश्यातील स्वाबचे नमुने पॉझिटिव्ह आल्याचे त्याला सांगण्यात आले होते. त्यानंतरही तो घाबरलो नाही. डॉक्टरांनी तुमची शरीर क्षमता चांगली असल्याचे सांगत त्याला धीर दिला. रुग्णालयात असताना तो त्याच्या आईवडिलासोबत सतत संपर्कात असायचा. कधीही आपल्याला कुठला संक्रमण झालेला आहे, याचे दडपण मनावर येऊ दिले नाही. परिणामी, १४ दिवस कसे रुग्णालयात गेले हे त्याला कळलेच नाही. दररोज रुग्णालयात सकाळी उठून मेडिटेशन व प्राणायाम करायचा. दररोज गरम पाणी पिणे, दिवसभर सकारात्मक विचार करणे, आपल्या अलगीकरण कक्षात तो सामान्य व्यक्तीसारखाच राहायचा. रुग्णालयातील सर्वच वैद्यकीय अधिकारी,परिचारिका,स्वच्छता कर्मचारी यांचे मनोबल वाढविणारे विचार आणि सहकार्य त्याला मिळत राहिल्याने त्यालाही बरे वाटत होते. फोनवरून घरातील कुटुंबासोबतच शेजारी व नातेर्वाइंकांनी मनोबल वाढविण्यासाठी संपर्क करून सकारात्मक ऊर्जा देत राहिले. विशेष म्हणजे रुग्णालयात असताना दररोज सोशल मिडियावर त्याच्याबद्दल अनेक पोस्ट व्हायरल व्हायच्या. परंतु, त्याने त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. आपण कसे चांगले आहोत, हे दाखविण्यासाठी तो सतत व्हिडिओ पाठवत होता. रुग्णालयात दिलेल्या प्रत्येक सूचनांचे काटेकोर पालन केल्याने त्याच्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण अखेर पर्यंत आढळले नाही. त्यातच ८ एप्रिल,९ एप्रिलला पुन्हा घशाचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचाही रिपोर्ट १० एप्रिलला निगेटिव्ह आल्याने अखेर त्याला १० एप्रिललाच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्णालयातून सोडताना रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर,नर्स व इतरांनी त्याला उत्साहाने निरोप दिला. घरी पोचताच सर्वांनी फिजिकल डिस्टंसिंग पाळत त्याचे स्वागत केले. त्यानंतरही १४ दिवस तो होमक्वारटांईन राहिला. या काळात घरातील सदस्यांशी अंतर ठेवून तो संवाद साधायचा. रुग्णालयातील आपल्या दिनचर्येविषयी चर्चा करायचा. या काळात त्याला अनेकांनी फोनवरून प्रोत्साहित केले. त्यांनी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे त्याने तंतोतंत पालन केले. दरम्यान, दरदिवशी रुग्णालयातून माझी विचारपूस करण्यासाठी डॉक्टर यायचे. इम्यूनसिस्टम स्ट्राँग असल्याचे त्याला सांगायचे. याचा त्याला भरपूर फायदा झाला. या सर्व प्रक्रिया अत्यंत जबाबदारीने पूर्ण करून अखेर ९ मे रोजी घराबाहेरील विश्व पाहण्यासाठी त्याने घराचा उंबरठा ओलांडला.
कोरोनाला घाबरून न जाता त्याचा कणखरपणे सामना करणे, अत्यंत लाभाचे आहे. सुरक्षा आणि काळजी घेणे, हे तर अत्यावश्यक आहेच. पण तरीही चुकून कोरोनाची लागण झालीच, तर डगमगून न जाता नियमांचे काटेकोर पालन केले तर कोरोनाचा लढा आपण सहज जिंकू सुद्धा शकतो, असे तो सांगायला विसरला नाही. प्रत्येकाने, स्वतःची, कुटुंबाची आणि आपल्या देशवासीयांची काळजी कशी घेतली पाहिजे, याची शिकवण कोरोनाशी लढताना मिळाल्याचे त्याने म्हटले.