अभयारण्यातून धावताहेत तासी ५० च्या वेगाने गिट्टीचे ट्रक

0
242

भंडारा,दि.१३)ःकोका वन्यजीव अभयारण्यातून जाणाèया पालोरा ते साकोली, खडकी ते भिलेवाडा रस्त्यावरून गिट्टीचे ट्रक व अन्य वाहने भरधाव वेगाने धावत असतांना त्यांच्यावर नियंत्रण व शिस्त लावण्याची गरज आहे. अभयारण्यातून तासी २० किमी वेगाची मर्यादा असतांना तासी ५० किमीच्या वेगाने व सरार्स हार्न वाजविले जावून वाहने उभे केले जात असल्याने अभयारण्यातील शांतता धो्नयात आली आहे. भरधाव वेगाने धावणाèया ट्रकांमुळे वन्यजीवांना धोका निर्माण झालेला आहे. प्रकरणी वनाधिकाèयांनी गांभिर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. कोका वन्यजीव अभयारण्यातून शहरांच्या दिशेने जाणारे रस्ते वाहतूकदारांसाठी वरदान ठरू पाहत आहेत. दिवसभर या रस्त्यांवरून भरधाव वेगाने हार्न वाजवित ट्रक, टिप्पर व अन्य वाहने यांची वाहतूक होत आहे.

गिट्टी व अन्य वाहतूक होत असलेल्या रस्त्यांमध्ये पालोरा ते साकोली, खडकी तेभिलेवाडा या रस्त्यांचा समावेश आहे. अभयारण्यादरम्यान वाहने थांबत असल्याने शांतता भंग होत चालली आहे. शिवाय वन्यजीवांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप करण्यासारखे होत आहे. अभयारण्यातून वाहने चालवितांना वेग मर्यादा तासी २० किमीची आहे. तर वाहनातून खाली उतरण्यास मनाई आहे. परंतू काही हौशी सायंकाळीभरधाव वाहनांनी जावून आपली फोटोग्राफीची हौश भागवून घेत आहेत. या रस्त्यांवरून वन्यजीव मार्गक्रमण करीत असतांना त्यांना पाहण्यासाठी विनापरवानगी अभयारण्यात जाणाèयांची संख्या उन्हाळयाच्या दिवसात वाढीस लागली आहे. या सर्व प्रकारांमुळे अभयारण्य वन्यजीवांसाठी असुरक्षित झाल्यासारखे असून वनविभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. भरधाव वेगाने धावणाèया वाहनांवर कारवाईची गरज आहे.