चिचगड,दि.18ः देवरी तालुक्यातील ढासगड येथे जिल्हा नियोजन समिती मार्फत पर्यटन विकास अंतर्गत विकास कामाचे भूमिपूजन आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ढासगडचे महाराज ईश्वर दखने,पोलीस पाटील मारगाये,माजी जि.प.सदस्या उषा शहारे,मोतीलाल पिहिदे,चैनसिंग मडावी, बड़ीराम कोटवार,दिलीप परिहार,भुवन नरवरे,जीवन सलामे,रामेश्वर बहेकार,कुलदीप गुप्ता व इतर पदाधिकारी व भक्त उपस्थित होते.